Police investigation intensifies in Beed as new allegations emerge in the Vilas Ghule murder case. saam tv
महाराष्ट्र

विलास घुले हत्येत बलात्काराचा ट्विस्ट, महिलेचा घुलेच्या मित्रावर ब्लॅकमेलिंगचा आरोप

Vilas Ghule Case: बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणात एसआयटीला यश मिळालंय. महत्त्वाचा पुरावा हाती लागल्याने या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय. हॉटेल व्यावसायिक विलास घुलेच्या हत्येआधी नेमकं काय घडलं होतं? आणि तपासाची दिशा कशी बदललीये? पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...

Suprim Maskar

बीडमधील हत्या, बलात्काराच्या गुन्ह्यांची मालिका काही संपायला तयार नाही. केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय...आधी या प्रकरणात विलास घुलेची हत्या झाल्याचं बोललं जात होतं, पण आता या हत्येमागे केवळ वाद नसून महिलेचा बलात्कार आणि ब्लॅकमेलिंगचा प्रकार समोर आल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. 20 जूनच्या रात्री विलास घुले या तरुणाची हत्या झाली... या हत्येनंतर नातेवाईकांनी घुलेचा मृतदेह थेट पोलीस ठाण्यासमोर ठेवून आंदोलन केलं..त्यानंतर पोलिसांनीही 9 आरोपींना अटक केली... मात्र आता या प्रकरणातील महिलेनं समोर येऊन केलेले खुलासे पोलिसांचेही डोकं चक्रावून टाकणारे आहेत.

विलास घुलेवर महिलेचे आरोप -

विलास घुलेचा मित्र उमेश मानेनं माझ्यावर अत्याचार करून व्हिडिओ बनवले

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन उमेशनं वारंवार अत्याचार केले...

3 जूनला विलास घुलेनं धमकी देऊन मला संबंध ठेवण्यास सांगितलं

पूर्वीसारखेच संबंध नाही ठेवले तर लेकरांना आणि नवऱ्याला जीवे मारण्याची विलासकडून धमकी

20 जूनच्या रात्री विलास आणि उमेश मानेची घरासमोर येऊन शिवीगाळ

विलास आणि उमेशची समजूत काढण्यासाठी माझे वडील, पती आणि नातेवाईक हॉटेलवर गेले

हॉटेलवर विलास आणि उमेशकडून काचेच्या बाटल्या आणि विटांनी पती, वडिलांना मारहाण

बचावाच्या प्रयत्नात वडिलांच्या हल्ल्यात विलास घुलेचा मृत्यू

पीडित महिलेनं बलात्काराचे आरोप केल्यामुळे हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय. एकीकडे विलास घुलेच्या नातेवाईकांनी हत्येचा कट रचून हल्ला केल्याचा आरोप केलाय, तर दुसरीकडे पीडितेने हा हल्ला आत्मसंरक्षणासाठी केल्याचा दावा केल्यानं पोलिसांसमोर तपासाचं नवं आणि मोठं आव्हान उभं ठाकलंय...आता पोलिस या आरोपानंतर आपल्या तपासाची दिशा बदलून हत्या प्रकरणातील इतर धागेदोरे कसे शोधून काढणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT