काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करणारे कार्यकर्ते नसून ते पोसलेले गुंड होते, असं म्हणत काँग्रेस नेते विजय वट्टेवार यांनी टीका केलीय. मुंबईत भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड केली. यावरून भाजपवर विरोधकांकडून टीका केली जातेय.
अमित शहा यांनी राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्याविषयी केलेल्या विधानावरून राजकारण तापलंय. भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या विधानच्या निषेधार्थ आज काँग्रेसकडून अमित शहा आणि भाजप विरोधात आंदोलन करण्यात आले. दिल्लीतही राहुल गांधी आणि भाजप खासदारांमध्ये धक्काबुक्की झाली.
त्यानंतर मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयावर मोर्चा काढत कार्यालयाची तोडफोड केली. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या बॅनरवर शाई फेकली. भाजपच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. यावरून राजकीय वर्तुळात संताप व्यक्त केला जात आहे. काँग्रेस नेत्यांकडून भाजपवर टीका केली जात आहे. राज्यातील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला म्हणून काँग्रेसकडून शांततेत आणि संवैधानिकपणे निषेध आंदोलन करत होतो. आम्ही कोणाच्या अंगावर दगड घेऊन धावून गेलो नाही. कोणावर दगड फेकला नाही. आम्ही शांतपणे हे आंदोलन करत होतो. मात्र याला प्रत्युत्तर म्हणून विरोध पक्ष असलेल्या काँग्रेच्या कार्यालयावर दगडफेक होतस असेल , कोणाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला जात असेल तर वाईट आहे.
आधीच राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर चर्चा सुरू आहे, त्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. राज्यात महायुतीचं सरकार येताच परभणी आणि बीडमधील दोन घटना झाल्या आहेत. त्यामुळे लाजेने मान खाली घालावी लागत आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणालेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर राजकारण तापलंय. भाजपविरोधात आंदोलन केली जात आहेत.
याचे पडसाद देशभर उमटले आहेत. दरम्यान भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षाकडून एकमेकांवर आरोप केले जात आहेत. मुंबईत भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयावर आंदोलन केलं. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या पोस्टरवर शाईफेक करत भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं कार्यालय फोडलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.