
शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार अशी घोषणा महायुतीने जाहीरनाम्यात केली होती, अजूनही सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार हे सांगितलेलं नाही. राज्यातील लाडकी बहीण योजनेतील महिलांना २१०० रुपये देणार असे आश्वासन दिले, पण अजूनही अंमलबजावणी बाबत चित्र स्पष्ट नाही. असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारला केला आहे.
राज्यपाल अभिभाषणात महायुती सरकारच्या कामकाजाबाबत अनेक मोठे दावे करण्यात आले आहेत. पण राज्यातील आर्थिक स्थिती पाहता ते फोल ठरण्याची शक्यता आहे. राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे का? असा प्रश्न आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. एकीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत २८ टक्के वाढ झालीय, सामान्यांचे बजेट कोलमडले आहे. लोकांवर महागाईची टांगती तलवार असल्याचंही ते म्हणाले.
राज्यपाल अभिभाषणावरील चर्चेचा आज शेवटचा दिवस होता, यावेळी चर्चेत सहभागी असताना विजय वडेट्टीवार यांनी राज्याची आर्थिक स्थिती बिघडली असल्याचा आरोप केला. राज्यपाल यांनी एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होणार असं म्हणाले, पण महाराष्ट्रावर ९ लाख कोटींचे कर्ज आहे. दुसरीकडे राज्यातील महिला तरुणी गायब आहेत याचा उल्लेख मात्र राज्यपालांच्या भाषणात नव्हता. असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
लाडकी बहिणीचे पैसे बँकेने कर्जासाठी वळवल्याचे उदाहरण समोर आले आहे. अमरावतीमधील निर्मला चारपे यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे आले, ते बँकेकडून परस्पर कर्जासाठी वळवण्यात आले. सरकारने मग जे नियम लावले, जीआर काढले त्याला काय अर्थ आहे असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.