Vijay Wadettiwar Saam TV
महाराष्ट्र

MPSC Exam: कृषी सेवा परीक्षेतील उमेदवारांना तात्काळ नियुक्ती द्या, विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

Vijay Wadettiwar News: कृषी सेवा परीक्षेतील 202 उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना तात्काळ नियुक्ती द्या, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली आहे.

Rohini Gudaghe

Vijay Wadettiwar On MPSC Exam

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC Exam) कृषी सेवा परीक्षा (Agricultural Services Examination) घेण्यात आली होती. महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेमधून एकूण २०२ उमेदवारांची शिफारस महाराष्ट्र लोकसेवा आयोगमधून करण्यात आली आहे. परंतु अद्याप या उमेदवारांना नियुक्ती देण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी याप्रकरणी आक्रमक झाले आहेत. (Latest Marathi News)

हे उमेदवारांना (Agricultural Exam Recruitment) मागील ७ महिन्यापासून नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. ते मागील दोन दिवसापासून आझाद मैदानात बेमुदत आंदोलनाला बसले आहेत, या उमेदवारांना नियुक्तीचे आदेश तात्काळ द्यावेत, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी विधानसभेत केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विजय वडेट्टीवार यांची मागणी

या उमेदवारांना मागील ७ महिन्यापासून नियुक्ती न दिल्याने ते दोन दिवसापासून आझाद मैदानात बेमुदत आंदोलनाला बसलेले (Vijay Wadettiwar News) आहेत. या नियुक्त्या रखडल्यामुळे अकोला तसेच अनेक जिल्ह्यात उपविभागीय कृषी अधिकारी पदांचा पदभार द्यायला, त्या दर्जाचे अधिकारी उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांचा पदभार खालच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.

त्यामुळे शासनाने यासंदर्भात तातडीने कार्यवाही करुन या २०२ उमेदवारांच्या नियुक्तीचे आदेश तात्काळ काढण्यात यावेत, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ( Vijay Wadettiwar On Agricultural Exam) केली आहे. त्यांना सरकारकडून याबाबत सकारात्मक उत्तर देण्यात आलं आहे.

विद्यार्थ्यांचे बेमुदत आंदोलन

कृषी उपसंचालक (वर्ग १) १९, तालुका कृषी अधिकारी (वर्ग २)-६१, मंडळ कृषी अधिकारी (वर्ग २)-१२२ अशा एकूण २०२ उमेदवारांची शिफारस महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधून करण्यात आली आहे. यासर्व उमेदवारांची कागदपत्रे दिनांक १७ व १८ ऑगस्ट, २०२३ रोजी तपासून पूर्ण झालेली आहे.

मागील ७ महिन्यापासून यांच्या नियुक्तीची प्रक्रिया (Agricultural Exam Recruitment Issue) कृषी विभागाकडून अजूनही पूर्ण झालेली नाही. यामुळे या उमेदवारांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळेच ते बेमुदत आंदोलन करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT