महाराष्ट्राचा प्रश्न असला की केंद्र सरकार दुजाभाव करते - मंत्री विजय वडेट्टीवार Saam TV
महाराष्ट्र

OBC Reservation: महाराष्ट्राचा प्रश्न असला की केंद्र सरकार दुजाभाव करते - विजय वडेट्टीवार

'राजेंद्र कोंढरे (Rajendra Kondhare) यांनी मराठा संघाची वाट लावली ते काहीपण बोलत सुटतात त्यांनी सारथीवर कसा कब्जा मिळविला सगळ्यांना माहीत असून त्यांना रावना सारखी तोंड आहेत.'

मंगेश मोहिते

नागपूर : महाराष्ट्राचा प्रश्न असला की केंद्र सरकारचा दुजा भाव असतो पुनर्विचार याचिकेवर सुप्रीम कोर्टात 17 तारखेला आमच्या बाजूने निर्णय येईल ही अपेक्षा आहे असं वक्तव्य मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं. तसंच केंद्रासरकरच्या भूमिकेमुळेच 105 नगर परिषद निवडणुकांमधील ओबीसी आरक्षण वाचविता आलं असत मात्र महाराष्ट्राचा प्रश्न असला की केंद्र सरकारचा दुजाभाव असतो अशी टीका विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली आहे.

दरम्यान 'मी ओबीसीचा (OBC) सच्चा कार्यकर्ता आहे. मी आज महाज्योति साठी काय काम केलं ते सांगितलं आहे. तसंच राजेंद्र कोंढरे (Rajendra Kondhare) यांनी मराठा संघाची वाट लावली ते काहीपण बोलत सुटतात त्याने सारथी वर कसा कब्जा मिळविला सगळ्यांना माहीत आहे. रावना सारखी तोंड त्यांना आहेत त्यामुळे तो माझ्यावर आरोप करतं असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

हे देखील पहा -

ओबीसी आरक्षण (OBC Reservation) संदर्भात याचिकेवर 17 तारखेला सूनवाई होणार आहे. त्यासोबतच OBC महासंघाच्या वकील महासंघाच्या वतीने अप्लिकेशन सादर केले होते त्यावरतीसुद्धा सूनवाई 17 जानेवारीलाच सुनावणी होऊ शकते. आणि या सुनावणीमध्ये आम्ही इम्पिरिकल डेटा गोळा होत नाही, तोपर्यंत सध्या राज्य शासनाच्या अध्यादेशाप्रमाणे 50 टक्यांची मर्यादा पळून आरक्षण द्यावे आणि या प्रकरणाची सुनवाई 7 जजेस समोर व्हावी अशी मागणी केली असल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघांचे अध्यक्ष (OBC National Federation) बबनराव तायवाडे यांनी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई आघाडीवर

Chopda Vidhan Sabha : निवडणुकीचे काम टाळणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांवर गुन्हा; विनापरवानगी राहिले गैरहजर

Assembly Election Results 2024 : राज्यात कोणाचं सरकार येणार? सुरुवातीच्या कलात महायुती आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: बहुमताचा आकडा गाठला, सुरुवातीचा कल महायुतीकडे, भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत!

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

SCROLL FOR NEXT