Vijay Vadettiwar
Vijay Vadettiwar Saam TV
महाराष्ट्र

'विश्वासदर्शक ठरावाला आम्ही गेलो असतो तरी...', विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं गैरहजेरीचं कारण

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी विश्वासदर्शक ठरावावेळी गैरहजर का राहिलो याचं कारण सांगितलं. ते म्हणाले, 'विधानसभा अध्यक्ष ठरल्यावर विश्वास दर्शक ठराव होता, आधी चर्चा मग ठराव होईल असं आम्हाला वाटलं. मात्र, विधानभवनाच्या गेटवर पोहचल्यावर गेट बंद झालं.

मात्र, याबाबत संभ्रम निर्माण केला जात आहे. आम्ही गैरहजर राहिलो याकडे वेगळ्या पद्धतीने बघू नये. कुठलाही संबंध निर्माण केला जाऊ नये. आमच्या राजकीय जीवनावर कुठलेही प्रश्नचिन्ह निर्माण केलं जाऊ नये असं वडेट्टीवार म्हणाले. तसंही आम्ही गेलो असतो तरी काहीही फरक पडला नसता, गैरसमज करून घेऊन नये, जनतेने आणि कुणीही करू नये असंही म्हणाले.

पाहा व्हिडीओ -

दरम्यान, त्यांनी यावेळी ओबीसी आरक्षणासह (OBC Reservation) निवडणुका व्हायला पाहिजेत अशी आमची मागणी असल्याचं ते म्हणाले. तसंच बांठीया आयोगाला आम्ही अहवाल मागितला होता, आज डेटा उपलब्ध झाला. आडनावावरून जात ठरवू नका अशी आमची मागणी आहे. शिवाय आता राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित झालेल्या निवडणुका थांबल्या पाहीजे, केंद्रात आणि राज्यात एकच सरकार आहे.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्या जाऊ नये. ओबीसींची संख्या वाढली आहे, त्यामुळं लोकसंख्या नुसार आरक्षण दिलं पाहिजे. ओबीसींचं नुकसान होईल त्यामुळे घोषित झालेल्या निवडणूका स्थगित करून ओबीसी आरक्षणासह निवडणुका व्हाव्या असं मत व्यक्त केलं. तसंच सरकारने जनहिताच्या कामांवर स्थगिती आणणे चुकीचे आहे. सरकारला विनंती आहे वैयक्तिक कामं थांबवा मात्र लोकांच्या हिताची कामं थांबवू नये.

सरकार सरळ चालते की नाही हे बघणे महत्त्वाचे ठरेल. महाराष्ट्राला विकास हवा आहे, विकासाच्या दृष्टीने जात असेल तर उत्तम आहे. कायद्याने निर्णय होणे अपेक्षित आहे. देशातील लोकांचं लक्ष आहे, निकालावर मंत्रिमंडळ अवलंबून असेल, सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतो ते बघावे लागेल. शिवाय ओबीसी जागरण दिंडी ऑक्टोबरमध्ये काढणार असून रत्नागिरीपासून या दिंडीला सुरुवात करणार आहे. ओबीसींच्या हक्कासाठी ही दिंडी काढणार असून ती राज्यभर फिरणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray : गुजरातला विरोध कधीच नव्हता, पण... ; उद्धव ठाकरे अलिबागमधून भाजपवर कडाडले

Maharashtra Politics: '...म्हणून ते शपथविधीला आले होते', प्रफुल्ल पटेलांचं अमोल कोल्हेंबद्दल स्फोटक विधान

IPL Orange Cap: विराटचा ऑरेंज कॅपवर कब्जा! पाहा टॉप ५ फलंदाज

Jayant Patil On Ajit Pawar | जयंत पाटील यांचा अजित पवारांवर निशाणा

Baramati News: मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेवा; मतदान केंद्रावर मेडीकल कीटची सुविधा

SCROLL FOR NEXT