Vijay Ghadge Health Saam Tv
महाराष्ट्र

Vijay Ghadge Health : मोठी बातमी! अजित पवारांची पुण्यात भेट, लातूरला परतताना अचानक विजय घाडगे यांची प्रकृती खालावली

Vijay Ghadge News : पुण्यामध्ये अजित पवार यांची छावा संघटनेचे नेते विजय घाडगे यांनी भेट घेतली. या भेटीनंतर लातूरला परतताना अचानक विजय घाडगे यांची तब्येत बिघडली. त्यांच्यावर ॲम्बुलन्स उपचार सुरु करण्यात आले.

Yash Shirke
  • छावा संघटनेचे नेते विजय घाडगे यांनी अजित पवार यांची पुण्यात भेट घेतली.

  • अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर ते पुण्याहून लातूरला परत होते.

  • अचानक घाडगे यांची तब्येत खालावली, त्यांच्यावर ॲम्बुलन्समध्येच उपचार सुरु करण्यात आले.

पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छावा संघटनेचे नेते विजय घाडगे यांची भेट झाली. अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर विजय घाडगे हे लातूरला परतत होते. पण रस्त्यातच अचानक त्यांची तब्येत बिघडली. ॲम्बुलन्समधून ते पुण्याहून लातूरला निघाले होते. तब्येत बिघडल्याने त्यांच्यावर ॲम्बुलन्समध्येच उपचार सुरु करण्यात आले. सूरज चव्हाण आणि त्यांच्या साथीदारांनी विजय घाडगे यांना बेदम मारहाण केली होती. मारहाण प्रकरणानंतर आज (२५ जुलै) घाडगे यांनी अजित पवार यांची भेट घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडीओ एक्सवर पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये कोकाटे हे सभागृहाचे कामकाज सुरु असताना मोबाईलवर रमी खेळत असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला होता. यावरुन विरोधकांनी कृषीमंत्री आणि राज्य सरकारवर निशाणा साधला होता. या प्रकरणावरुन कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

रमी प्रकरणादरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लातूर दौऱ्यावर होते. कृषीमंत्र्यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी छावा संघटनेद्वारे करण्यात आली. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तटकरे यांच्या समोर पत्ते उधळले. यादरम्यान राष्ट्रवादी आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांनी छावाच्या विजय घाडगे यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर सूरज चव्हाण यांच्यावर पक्षातून कारवाई करण्यात आली.

मारहाण प्रकरणानंतर विजय घाडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. मंगळवारपर्यंत माणिकराव कोकाटे यांच्यासंबंधित निर्णय घेतला जाईल अशा शब्द उपमुख्यमंत्र्यांनी दिल्याचे विजय घाडगे यांनी म्हटले आहे. सूरज चव्हाणला पुन्हा पक्षात घेतले जाणार नसल्याची माहितीही घाडगे यांनी दिली आहे. भेटीनंतर लातूरला जाताना त्यांची प्रकृती बिघडली. प्रकृती अधिक बिघडल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागेल असे डॉक्टर म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कुठल्याही अटीशर्ती न टाकता सरसकट कर्जमाफी करावी, पुणतांबातील शेतकऱ्यांची मागणी

BJP Leader Death : भाजपच्या बेपत्ता नेत्याचा मृतदेह कारमध्ये आढळला, राजकीय वर्तुळात खळबळ

राज्यसभेसाठी काँग्रेसची जोरदार फिल्डिंग; माजी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाने खेळ बिघडला

Viral Video: 40 शीच्या महिलेसोबत बॉयफ्रेंडला रंगेहात पकडलं; रस्त्यावर गर्लफ्रेंडने विचारला जाब

Belly Fat Yoga: रोजच्या अपचन आणि वाढत्या पोटामुळे वैताग आलाय? मग आजपासूनच करा हे पाच योगासन

SCROLL FOR NEXT