Mahadev Munde Case Saam tv
महाराष्ट्र

Mahadev Munde Case : महादेव मुंडेंच्या मानेवरचा मिसिंग तुकडा 'तो' पिशवीत घेऊन फिरतोय; विजय बांगर यांचा धक्कादायक खुलासा

Beed News : परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी विजयसिंह बांगर यांनी मुंडे यांच्या मानेच्या मिसिंग तुकड्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

Alisha Khedekar

बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली होती. ही हत्या होऊन कित्येक दिवस उलटूनही अद्याप मुंडेंच्या मारेकऱ्याला शोधण्यात पोलिसांना यश आलेले नाही. एकीकडे महादेव मुंडे यांची पत्नी न्याय मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहे. तर दुसरीकडे वाल्मिक कराडचे जुने सहकारी विजयसिंह बाळा बांगर यांनी मोठा गौप्य स्फोट केला आहे.

परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची भर चौकामध्ये धारदार शास्त्राने हत्या करण्यात आली. या हत्येला २० आठवडे पूर्ण झाले आहेत. मात्र महादेव मुंडे यांच्या मानेवरचा तुकडा मिसिंग असल्याचे मेडिकल रिपोर्ट मधून समोर आले होते. मानेवरचा तुकडा काढून तो गोट्या गीतेने पिशवीमध्ये ठेवला आणि वाल्मीक कराडच्या टेबल वरती मांडला असा धक्कादायक खुलासा विजयसिंह बाळा बांगर यांनी केला.

बांगर म्हणाले की, "महादेव मुंडे यांच्या मानेवरचा तुकडा काढून वाल्मीक कराड यांना दाखवण्यासाठी आणला होता. तो तुकडा वाल्मिक कराडच्या टेबल वरती मांडला गेला. गोट्या गीते तो तुकडा पिशवीमध्ये घेऊन गावभर फिरत होता. आणि परळी मध्ये सांगत होता की, आमच्या वाट्याला गेल्यास आम्ही असे हाल करतो." असे विजयसिंह बाळा बांगर यांनी सांगितले. मात्र तोच मानेचा तुकडा आता मिसिंग असल्याचे मेडिकल रिपोर्ट मधून देखील समोर आले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी महादेव मुंडे यांच्या पत्नीने हत्येला कित्येक दिवस होऊनही हल्लेखोर न सापडल्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी मुंडेंच्या पत्नीला अटक देखील करण्यात आली होती. तसेच धनंजय मुंडेंच्या फोनवरून कराडने महादेव मुंडेंच्या हत्येचा तपास थांबवला असा आरोप त्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Passport Free Travel : या देशात फिरण्यासाठी लागणार नाही पासपोर्ट, भारतापेक्षाही कमी असेल खर्च

Pune: विसर्जन मिरवणुकीत भयंकर घडलं; महिला पत्रकाराचा विनयभंग, ढोल ताशा पथकाच्या सदस्यावर आरोप

Maharashtra Live News Update: पुण्यात ढोल ताशा पथकातील सदस्याकडून महिला पत्रकाराचा विनयभंग

Ankita Walawalkar: बिग बॉस मराठीमधून प्रसिद्ध झालेल्या अंकिता वालावलकरचं वय किती?

Maharashtra Tourism : निसर्गाच्या कुशीत लपलेले महाराष्ट्रातील सुंदर गाव, सुट्ट्यांमध्ये नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT