Maharashtra Farmer End Life  Saam Tv
महाराष्ट्र

Vidarbha Farmers News: धक्कादायक! विदर्भात विधानसभा निवडणुकीदरम्यान १९७ शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, काय आहे कारण?

Maharashtra Assembly Election 2024: विदर्भात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले. पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्येच्या घटना वाढल्या आहेत. विधानसभा निवडणुकीदरम्यान १९७ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले.

Priya More

राज्यातील शेतकरी सध्या संकटामध्ये आहे. कधी पाऊस तर कधी दुष्काळ, डोक्यावर असलेले कर्जाचं ओझं यामुळे राज्यात शेतकरी आत्महत्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. मराठवाड्यामध्ये शेतकरी आत्महत्येच्या सर्वाधिक घटना घडताना दिसतात. त्या पाठोपाठ आता विदर्भातही शेतकरी आत्महत्येच्या घटना वाढत चालल्या आहेत.

विदर्भातील शेतकरी आत्महत्येबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. विदर्भातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले असून विधानसभा निवडणुकीदरम्यान १९७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्येच्या घटना वाढल्या आहेत. विधानसभा निवडणुकीदरम्यान १९७ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले. पश्चिम विदर्भात ११ महिन्यात ९८५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. राजकीय नेते विधानसभा निवडणुकीत व्यस्त असताना ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या ६० दिवसात विदर्भात १९७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.

विदर्भात सोयाबीन, कपाशीला हमीभाव मिळत नाही, कर्जबाजारी, शासकीय योजनेचा लाभ नाही आणि आर्थिक अडचणीमुळे शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. सर्वाधिक ३१७ शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्याची माहिती समोर आली आहे.

जानेवारी ते नोव्हेंबर पर्यंत ९८५ शेतकरी आत्महत्या

- पात्र शेतकरी आत्महत्या ३०६

- अपात्र शेतकरी आत्महत्या २८७

- चौकशीसाठी प्रलंबित प्रकरणे ३९२

विदर्भातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण -

- अमरावती जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या - २१९

- अकोला जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या - १४७

- यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या - ३१७

- बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या - २०८

- वाशिम जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या- ९४

- एकूण जिल्ह्यातील आत्महत्या - ९८५

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Serial Update : तुमच्या आवडत्या मालिका नवीन वेळेत, आताच वेळापत्रक नोट करा

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट, धो धो पाऊस कोसळणार

Weight Loss Facts: उपाशी राहिल्याने वजन कमी होतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारणं

Horoscope Saturday Update : शत्रु त्यांचे काम करतील, तुम्ही तुमचे काम करा; आजचे राशीभविष्य

Indian Railway: रिल्स बनवणाऱ्यांनो ऐकलं का? रेल्वे स्टेशनवर रील बनवाल तर याद राखा, नेमकी काय कारवाई होणार?

SCROLL FOR NEXT