Vidhan Sabha Election Saam Digital
महाराष्ट्र

Vidhan Sabha Election : मनोज जरांगें-संभाजी राजे एकत्र येणार?; विधानसभा निवडणुकांबाबत 'राजें'चं सूचक वक्तव्य

Sandeep Gawade

मनोज जरांगे पाटील आणि माझं उद्दिष्ट एकच आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांसाठी जरांगें सोबत चर्चा करणार असल्याचं स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष आणि माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राज्यात आणखी एक आघाडी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण जनसंवाद जागृती यात्रेची आज सांगता झाली. आता विधानसभा निवडणूक लढायची की नाही याचा निर्णय मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टला घेणार आहेत. त्यासाठी मराठा समाजाला आंतरवाली सराटीत मोठ्या संख्येने येण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयाकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागले असताना 'स्वराज' पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी विधानसभा निवडणुकांसंदर्भात मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्याचे संकेत दिले आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा झालेली नाही, मात्र चर्चा होणार नाही हे मी नाकारू शकत नाही. मनोज जरांगे यांचा आणि माझा उद्देश एकच आहे, असं संभाजी राजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. शेवटी माझ्या पणजोबांनी म्हणजे शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं. बाबासाहेब आंबेडकर यांनी ते घटनेत आणलं. मनोज जरांगे पाटील यांना माझा नेहमीच पाठींबा राहिला आहे. त्यांच्याशी राजकीय चर्चा झाली नाही मात्र लवकर चर्चा होईल, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे.

संभाजीराजे छत्रपती लोकसभा निवडणुकीत मराठवाडा किंवा कोल्हापुरातून निवडणूक लढवतील, अशी शक्यता होती. मात्र, कोल्हापूरमधून काँग्रेसने शाहू छत्रपती यांना तिकीट दिलं. त्यामुळे त्यांनी निवडणूक लढली नाही. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. तिकडे जरांगेंनीही तयारी सुरू केली आहे. राजकीय पक्ष त्यांनी निवडणूक लढवावी, असं आवाहन करत आहेत. त्यामुळे आता २९ ऑगस्टच्या जरांगेंच्या भूमिकेकडे आणि संभाजीराजेंच्या भूमिककडे राज्याचं लक्ष वागलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT