Maharashtra Legislative Council Elections Saam TV Marathi News
महाराष्ट्र

महायुतीतच सामना? कोकणात राष्ट्रावादी-शिंदेसेनेत संघर्ष, तर ठाणे-पालघरमध्ये भाजप-शिंदेसेना आमनेसामने?

MahaYuti conflict Latest news : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपावरून मोठा संघर्ष उफाळला आहे. कोकण, पुणे आणि ठाणे-पालघरमध्ये भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी आमनेसामने आल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

Suprim Maskar

Maharashtra Legislative Council Elections : राज्यात विधान परिषद निवडणुका जाहीर होताच महायुतीमध्ये जागावाटपाचा मोठा पेच निर्माण झालाय. कोकणात शिंदेसेना विरुद्ध दादांची राष्ट्रवादी,पुण्यात भाजप- शिंदेसेना आमनेसामने आल्याने अंतर्गत संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे विधानपरिषदेसाठी कुठे आणि कसा सामना रंगणार आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 विधान परिषद जागांची निवडणूक जाहीर करताच महायुतीमध्ये अंतर्गत जागावाटपावरून मोठा पेच निर्माण झालाय...कोकण आणि पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दोन जागांवरून महायुतीतील मित्रपक्षांमध्ये उमेदवारीवरून उघड चढाओढ सुरू झालीय... त्यामुळे बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे जागांवर नेमका हक्क कोणाचा यावरून रस्सीखेच होण्याची चिन्हं आहेत.

कोकणातील एका जागेवरून शिंदेसेना आणि दादांच्या राष्ट्रवादीत संघर्ष उफाळून आलाय... शिंदेसेनेकडून विकास गोगावले तर राष्ट्रवादीकडून सुनील तटकरेंचा मुलगा अनिकेत तटकरे विधानपरिषदेसाठी आग्रही आहे...

तर ठाणे आणि पालघरच्या एका जागेसाठी शिंदेसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच आहे... ठाणे-पालघर मतदारसंघात एकूण 1 हजार 30 नगरसेवक असून भाजपचे 444 तर शिंदेसेनेचे 326 नगरसेवक आहेत. त्यामुळे युतीत शिंदेसेना ही जागा भाजपला सहजासहजी सोडणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडीची 71 मतं निर्णायक ठरणार आहेत...

दुसरीकडे पुण्यात भाजप आणि दादांच्या राष्ट्रवादीत संघर्ष पेटलाय... पुण्यात भाजपचे 306 तर राष्ट्रवादीचे 344 नगरसेवक निवडून आलेत.. त्यामुळे भाजपकडून गणेश बीडकर आणि राष्ट्रवादीकडून तीन जण इच्छुक आहेत...

दरम्यान कोकणातील जागेसाठी शिंदेसेनेच्या भरत गोगावलेंनी आपल्या मुलाच्या उमेदवारीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. तर राष्ट्रवादीनं वेट अँड वॉचचा पवित्रा घेतला...

विधानपरिषद निवडणुकीत महायुतीतच सामना?

विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर य़ेण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणाला कोणती जागा मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...

ब्युरो रिपोर्ट, साम टिव्ही न्यूज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'धोकादायक कुत्र्यांना इंजेक्शन देऊन मारा', सुप्रीम कोर्टाचे निर्देश

Maharashtra News Live Update : जालना जिल्ह्यातील पेट्रोलपंपांवर नागरिकांची तुफान गर्दी

sugarcane juice: ऊसाचा रस प्यायल्याने रक्तातील शूगर वाढते का?

20 हजार कोटींची ‘ट्युशन फॅक्टरी’; कोचिंगचा गोरखधंदा, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ

Petrol-Diesel Rate Rise: आठवडाभरात पेट्रोल-डिझेलची दुसऱ्यांदा दरवाढ; शेतकरी आणि सामान्यांच्या संतापाचा उद्रेक

SCROLL FOR NEXT