Uddhav Thackeray Saam TV Marathi
महाराष्ट्र

उद्धव ठाकरे विधान परिषदेची निवडणूक लढणार? सुप्रिया सुळेनंतर काँग्रेसकडूनही मागणी

Uddhav Thackeray MLC election : विधान परिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे उतरावेत, अशी सुप्रिया सुळे आणि काँग्रेसकडून मागणी वाढली आहे. महाविकास आघाडीच्या रणनीतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Namdeo Kumbhar

will Uddhav Thackeray contest MLC election Maharashtra : राज्यात होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उतरण्याची शक्यता आहे. कारण, खासदार सुप्रिया सुळे, विजय वडेट्टीवार यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांकडून तशी मागणी केली जातेय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तर उद्धव ठाकरे उमेदवार नसतील तर विधान परिषदेला उमेदवारी देण्याचा विचार केला जाईल, अशीच भूमिका घेतली आहे.

त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेची निवडणूक लढवावी, असे मत व्यक्त केले होते. त्यानंतर काही तासांतच काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनीही पोस्ट करत ठाकरेंनी विधान परिषदेच्या निवडणुकीत उतरावे, असे म्हणाले.

वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले ?

महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. या जागेवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लढणार असतील तर त्यांचे स्वागत असेल. पण ते जर निवडणूक लढणार नसतील तर मग महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? असेल याबाबत चर्चा करावी लागेल. कारण त्यानंतर येणाऱ्या राज्यसभेच्या जागी कोणत्या पक्षाचा उमेदवार असेल याबाबत ही आताच स्पष्टता करावी लागेल! महाविकास आघाडी एकसंध राहण्यासाठी तिन्ही पक्षाच्या समन्वयाने निर्णय घ्यावे लागतील. मीडियाच्या माध्यमातून याबाबत चर्चा घडवून आणणे उचित नाही, असे मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या ?

महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे. ही निवडणूक राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनीच लढावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची आग्रहाची विनंती आहे. उद्धवजी हे राज्यातील ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा राज्याला तसेच सभागृहाला सदैव फायदाच होत राहील, असा आम्हा सर्वांना विश्वास आहे. उद्धवजींनी या मागणीचा सकारात्मक विचार करावा ही नम्र विनंती, असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

मविआला फक्त १ जागा -

राज्यात विधान परिषदेच्या ९ जागांवर निवडणूक जाहीर झालेली आहे. त्यासाठीचे मतदान १२ मे रोजी मतदान होणार आहे. सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होईल. त्यानंतर सायंकाळी मतमोजणी होणार आहे. ९ जागांपैकी फक्त एकच जागा विरोधकांच्या वाट्याला आली आहे. संख्याबळानुसार, सर्वाधिक जागा भाजपला मिळणार आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेने (शिंदे गट) यांना प्रत्येकी एक एक जागा मिळू शकते. मविआ एका जागेवर कुणाला उमेदवारी देणार, याकडे राज्याचे लक्ष लागलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack - घरी एकटे असताना हार्ट अटॅक आला तर काय कराल? 'या' ३ गोष्टी वाचवू शकतात तुमचा जीव

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला नाही तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT