Mahayuti candidate  saam tv
महाराष्ट्र

Mahayuti Candidate List : पुणे, सोलापूर ते नाशिक, नागपूर; पाहा महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी एका क्लिकवर

Mahayuti candidate list for Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणूक 2026 साठी महायुतीच्या 17 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. भाजपच्या 11, शिवसेनेच्या 4 आणि राष्ट्रवादीच्या 2 उमेदवारांची संपूर्ण यादी जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

BJP Shivsena NCP Mahayuti Candidate List Vidhan Parishad Election 2026: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election 2026) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्याआधी महायुतीच्या १७ उमेदवारांची नावे समोर आले आहेत. जागावाटपातील तिढा सुटल्यानंतर अखेर कोण कोणत्या जागेवर लढणार, हे निश्चित झालेय.

१७ जागांपैकी भाजपने सर्वाधिक ११ जागांवर उमेदवार दिले आहेत. तर शिंदेंची शिवसेना ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून २ जागांवर उमेदवार देण्यात येतील. मविआकडून काँग्रेस सर्वाधिक जागांवर मैदानात असेल. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस आणि भाजप अशीच थेट लढत होणार आहे. महायुतीने कोणत्या जागांवर कुणाला संधी दिली? पाहूयात.. (Mahayuti Candidate List Vidhan Parishad Election 2026 )

महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी..

भाजपचे उमेदवार कोणते?

  1. अहिल्यानगर – प्राजक्त तनपुरे

  2. धाराशिव-लातूर-बीड – बसवराज पाटील

  3. भंडारा-गोंदिया – अविनाश ब्राह्मणकर

  4. सोलापूर – राजेंद्र राऊत

  5. छत्रपती संभाजीनगर-जालना – सुहास शिरसाट

  6. नांदेड – अमर राजूरकर

  7. नागपूर – डॉ.राजीव पोतदार

  8. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली – अरुण लखानी

  9. अमरावती – प्रविण पोटे पाटील

  10. सांगली-सातारा – धैर्यशील कदम

  11. जळगाव – श्री.नंदकिशोर महाजन

शिवसेना

1) ठाणे - रवींद्र फाटक

2) नाशिक - नरेंद्र दराडे

3) परभणी - सईद खान

4) यवतमाळ - दुष्यंन्त चतुर्वेदी/शितल राठोड यांची नावं चर्चेत

राष्ट्रवादी काँग्रेस

1) कोकण - अनिकेत तटकरे

2) पुणे - विक्रम काकडे

निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक

  • अधिकृत अधिसूचना जारी होणार - २५ मे २०२६ (सोमवार)

  • उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख - ०१ जून २०२६ (सोमवार)

  • उमेदवारी अर्जांची छाननी - ०२ जून २०२६ (मंगळवार)

  • अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस - ०४ जून २०२६ (गुरूवार)

  • मतदान (Date of Poll) -१८ जून २०२६ (गुरूवार) (सकाळी ८ ते दुपारी ४)

  • मतमोजणी (Counting of Votes) - २२ जून २०२६ (सोमवार)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोकण किनारपट्टीवर मासेमारीला ब्रेक

HSRP Number Plate Update: ... तर तुम्हाला भरावा लागणार ₹१००० चा दंड, HSRP नंबर प्लेटवर मोठी अपडेट

एक रुपया खर्च न करता किडनी आणि लिव्हर होईल स्वच्छ; सकाळी रिकाम्यापोटी प्या 'हे' ड्रिंक

Feeling Cold All The Time: तुम्हाला सतत थंडी वाजते? ही आहेत ६ कारणं

Pratapgad Fort : मराठ्यांच्या पराक्रमाचा अजरामर इतिहास, प्रतापगड किल्ल्याचे जुने नाव काय?

SCROLL FOR NEXT