Eknath Shinde Saam TV Marathi
महाराष्ट्र

मोठी बातमी! बच्चू कडू शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश, पण ठेवली 'ही' अट

Bachchu Kadu latest news : बच्चू कडू शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. प्रहार पक्ष विलीन करण्याची अट ठेवत ते विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

Namdeo Kumbhar

Bachchu Kadu latest news : राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका सुरू असतानाच राजकीय खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू आज सकाळी १० वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार असले, तरी प्रहार पक्षाच्या विलीनीकरणासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे.

मागील काही दिवसांपासून बच्चू कडू यांच्या नावाची चर्चा विधान परिषदेसाठी सुरू होती. शिवसेनेने त्यांचा 'प्रहार' पक्ष विलीन करण्याची अट ठेवली होती, ज्यावर आता शिक्कामोर्तब झाल्याचे दिसत आहे. मात्र, बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यापूर्वी एक अट घातली आहे. प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन केला जाईल, पण संघटना स्वतंत्र राहील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना "विलीनीकरणावर चर्चा करू," असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

बुधवारी रात्री उशिरापर्यंत उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिंदे आणि कडू यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत बच्चू कडू यांच्या पक्षप्रवेशाचा निर्णय अंतिम झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बच्चू कडू सकाळी १० वाजेच्या सुमारास शिवसेनेत प्रवेश करतील. त्यानंतर ११ वाजता विधान परिषदेसाठी ते शिवसेनेकडून अर्ज भरतील.

आज विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. पक्षप्रवेशाच्या सोहळ्यानंतर बच्चू कडू शिवसेनेकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या निर्णयामुळे बच्चू कडू यांचा 'प्रहार' पक्ष आता शिवसेनेत विलीन होणार असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा शिंदे गटासाठी मोठा विजय मानला जात आहे. दरम्यान, बच्चू कडू यांना सहा महिन्यांनंतर मंत्रिपद दिले जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tea Or Coffee Drinking Tips: नाश्त्याआधी की नाश्त्या नंतर, सकाळी चहा-कॉफी कधी प्यावी? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये शॉर्टसर्किटमुळे २ एकर शेतातील ऊस जळून खाक

दुष्काळावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं; शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार?

Automobile Tips : कारमधून सतत पेट्रोल डिझेलचा वास येतोय? 'ही' ६ कारणे वेळीच जाणून घ्या

Veg Non Veg Label: शॅम्पू, टूथपेस्ट आणि साबणवर येणार व्हेज, नॉन व्हेजच लेबल; सरकारचा नवा नियम

SCROLL FOR NEXT