Uddhav Thackeray  Saam tv
महाराष्ट्र

राणेंनी कोकणात डाव टाकला! उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का; शेवटच्या तासात बाळ मानेंची माघार

Konkan MLC Election 2026 : कोकण विधान परिषद निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट. ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अनिकेत तटकरे यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.

Namdeo Kumbhar

Aniket Tatkare Latest News : विधान परिषद निवडणुकीत कोकणातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांनी शेवटच्या तासात आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. ऐनवेळी घेतलेल्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. नारायण राणेंनी कोकणात टाकलेला डाव यशस्वी ठरल्याची चर्चा सुरू झाली आहे. बाळ मानेंच्या या माघारीमुळे आता या मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र पूर्णपणे बदलले आहे. कोकणातून आता अनिकेत तटकरे यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. अनिकेत तटकरे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार आहेत.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या काही तासात नितेश राणे यांनी गेम फिरवला. राणे यांनी मविआ उमेदवार बाळ माने यांची भेट घेतली. त्यानंतर सर्व नेते जिल्हा अधिकारी कार्यालयात दाखल झाले. राणेंच्या उपस्थित बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. हा ठाकरे आणि मविआसाठी मोठा धक्का मानला जतोय. दुसरीकडे नितेश राणेंच्या राजकीय चातुर्याची जोरदार चर्चा सुरू झाली.

मविआकडून ठाकरे गटाचे सुरेंद्र ऊर्फ बाळ माने यांनी कोकणातून उमेदवारी अर्ज भरला होता. अनिकेत तटकरे आणि बाळ माने यांच्यामध्ये जोरदार टक्कर होईल, असा अंदाज कोकणातील राजकीय नेत्यांकडून वर्तवली जात होती. पण नितेश राणेंच्या खेळीमुळे महायुतीचा एकतर्फी विजय निश्चित झाला आहे. बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेताना मविआवर टीका केला. मला हवी तशी साथ मिळाली नाही, असा आरोप माने यांनी यावेळी केला.

अर्ज माघारी घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बाळ माने यांनी मविआवर गंभीर आरोप केले. माझ्या अर्जावर मविआच्या आघाडीच्या नेत्यांच्या सह्या मिळाल्या नाहीत. मविआतील घटक पक्षाकडून साथ मिळाली नाही. त्यामुळे मला माघार घ्यावी लागली, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या निवडणुकीत होत असलेला घोडे बाजार टाळायचा होता. त्यामुळेही मी या निवडणुकीतून माघार घेतली असल्याचे माने म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अचानक भाव घसरला; किती रुपयांनी झालं स्वस्त?

SCROLL FOR NEXT