Election Result  Saam TV
महाराष्ट्र

Election Result Live Updates : कोकणची जागा आम्ही जिंकलो, बऱ्याच काळानंतर आम्ही विजय मिळवला - देवेंद्र फडणवीस

औरंगाबाद, नागपूर आणि कोकण विभागातील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत.

साम टिव्ही ब्युरो

कोकणची जागा आम्ही जिंकलो, बऱ्याच काळानंतर आम्ही विजय मिळवला - देवेंद्र फडणवीस

शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक निकालावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

आज ज्या काही निवडणुका झाल्या, त्यात कोकणची जागा आम्ही जिंकलो. बऱ्याच काळानंतर जिंकलो.

नागपूरची जागा आम्ही जिंकलो नाही, त्याचे दुःख आहे.

अमरावतीमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही. यावर आम्ही नक्की विचार करू.

नाशिकमध्ये तांबे हे अपक्ष निवडून आले. तीन पक्ष त्यांच्या विरोधात होते. तरीही जिंकले.

पोटनिवडणुकीसंदर्भात देखील चर्चा झाली. पोटनिवडणूकही आम्ही जिंकू, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

सत्यजित तांबेंची विजयी आघाडी, शुभांगी पाटील पराभवाच्या छायेत

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी चौथ्या फेरीतही मोठी आघाडी घेतली आहे. त्यांनी महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांना पिछाडीवर सोडलं आहे. चौथ्या फेरीअखेर सत्यजित तांबेंना ६० हजार १६१, तर शुभांगी पाटील यांना ३३ हजार ७७३ मतं मिळाली आहे. अजूनही एक फेरी बाकी असून जवळपास सत्यजित तांबेंचा विजय निश्चित झाला आहे.

अमरावतीत मविआचे धीरज लिंगाडे आघाडीवर; भाजपच्या उमेदवाराला टाकलं मागे!

अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मविआचे धिरज लिंगाडे 2378 मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे रणजित पाटील चौथ्या फेरीतही पिछाडीवर पडले आहेत. चौथ्या फेरीत धिरज लिंगाडे यांना 43340 मते भाजपचे रणजित पाटील यांना 41027 मते मिळाली आहेत.

अमरावतीत मविआचे धीरज लिंगाडे-भाजपचे रणजीत पाटील यांच्यात 'काँटे की टक्कर'

अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मविआचे धीरज लिंगाडे 1349 मतांनी आघाडीवर

रणजीत पाटील तिसऱ्या फेरीतही पुन्हा पिछाडीवर

तिसऱ्या फेरीत धीरज लिंगाडे यांना 34945 मते

भाजपचे रणजीत पाटील यांना 33596 मते

तिसऱ्या फेरीत धीरज लिंगाडे 1349 मतांनी आघाडीवर

तिसऱ्या फेरीची मतमोजणी पूर्ण, चौथ्या फेरीच्या मेमोजणीला सुरुवात

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक निकाल अपडेट

दुसऱ्या फेरीअखेर सत्यजीत तांबे यांना ३१ हजार ००९ मते

तर शुभांगी पाटील यांना १६ हजार ३१६ मते

दुसऱ्या फेरीअखेर सत्यजीत तांबे यांना १४ हजार ६९३ मतांची आघाडी

तर ५४४५ मते बाद

अमरावती: महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आघाडीवर

अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मविआचे धीरज लिंगाडे 1761 मतांनी आघाडीवर

रणजित पाटील तिसऱ्या फेरीतही पिछाडीवर

तिसऱ्या फेरीत धीरज लिंगाडे यांना 29708 मते

भाजपचे रणजीत पाटील यांना 27947 मते

14 टेबलावरील मतमोजणी अद्याप बाकी

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक निकाल

मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीला सुरुवात

दुसऱ्या फेरीतही सत्यजीत तांबे आघाडीवर

दुसऱ्या फेरीतही सत्यजीत तांबे ७ ते ८ हजार मतांनी आघाडीवर

मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणूक निकाल अपडेट्स

मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीत दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीच्या आठव्या फेरीनंतर महाविकास आघाडीचे विक्रम काळे यांना 20 हजार 195 मते मिळाली.

दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सूर्यकांत विश्वासराव यांना 13 हजार 604 मते मिळाली. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेले भाजपचे किरण पाटील यांना 13 हजार 570 इतकी झाली आहे.

महाविकास आघाडीचे विक्रम काळे हे 6591 मतांनी आघाडीवर

नाशिक पदवीधर निवडणूक निकाल अपडेट्स

मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीअखेरही सत्यजीत तांबे आघाडीवर

पहिल्या फेरीअंती तांबेंना जवळपास ८ हजार मतांची आघाडी

अद्याप अधिकृत घोषणा नाही

अमरावतीत मविआचे उमेदवार धीरज लिंगाडे आघाडीवर

अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत दुसऱ्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे 1600 मतांनी आघाडीवर आहेत. भाजपचे उमेदवार पिछाडीवर आहेत.

नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणूक निकाल, महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले विजयी

नागपूर शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रित येत जल्लोष केला. या विजयात माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार यांचा सिंहाचा वाटा असल्याने सर्व नेत्यांनी केदार यांना पेढा भरवत त्यांचं अभिनंदन केलं.

सुधाकर अडबाले यांनी पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण केला. दुसऱ्या फेरीतील ६४६० मतांपैकी २५०० मते सुधाकर आडबाले यांना मिळाली. आतापर्यंत सुधाकर आडबाले यांना एकूण १६५०० पेक्षा जास्त मते मिळाली आहेत.

नाशिक पदवीधर निवडणूक निकाल

नाशिक पदवीधर निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पहिल्या फेरीची मतमोजणी संपली असून, पहिल्या फेरीअखेर सत्यजीत तांबे आघाडीवर आहेत. थोड्याच वेळात अधिकृत आकडेवारी जाहीर करणार

मराठवाडा शिक्षक मतदारसंघ

मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणूक मतमोजणीत दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीनंतर महाविकास आघाडीचे विक्रम काळे यांना १० मते,

आता त्यांच्या मतांची संख्या 20 हजार 88 इतकी झालीय.

दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सूर्यकांत विश्वासराव यांना तिसऱ्या फेरीअखेर केवळ 1 मत

आता त्यांच्या मतांची संख्या 13 हजार 544 झाली आहे.

तर तिसऱ्या क्रमांकावर असलेले भाजपचे किरण पाटील यांना 3 मते मिळाली, त्यामुळे त्यांच्या मतांची संख्या 13 हजार 492 इतकी झाली आहे.

नागपूर शिक्षक मतदारसंघात २२ पैकी १९ उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होणार

नागपूर मतदारसंघात २२ पैकी अवघ्या तीन उमेदवारांना ३४०८ पेक्षा जास्त मतं 

उमेदवारी अर्ज भरताना दिलेली अमानत रक्कम जप्त होणार

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ मतमोजणी

पहिल्या फेरीचे निकाल हाती लागला आहे. यात भाजपचे उमेदवार रणजीत पाटील यांना ११३१२ मते मिळाली आहेत. तर माविआचे धिरज लिंगाडे ११९९२ मते मिळाली आहेत.स६८०मतांनी माविआचे उमेदवार धीरज लिंगाडे आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

बच्चू कडू यांच्या उमेदवाराला मिळाली केवळ 591 पहिल्या पसंतीची मते

मराठवाडा शिक्षक मतदार संघाची निवडणूक बहुरंगी करण्यात प्रहार संघटनेचाही मोठा वाटा होता. मात्र मतमोजणीत प्रहार संघटनेच्या उमेदवाराच्या वाट्याला केवळ 591 मध्ये आली. मेस्टा संघटनेचे अध्यक्ष संजय तायडे पाटील हे निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यांना प्रहार संघटनेकडून आमदार बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला होता.

विशेष म्हणजे भाजप आणि शिंदे गटाचा उमेदवार असतानाही बच्चू कडू यांनी मेस्टा संघटनेच्या उमेदवाराला पाठिंबा देत स्वतः मराठवाड्यातल्या अनेक ठिकाणी सभा आणि भेटीगाठी घेतल्या होत्या. मैत्रीपूर्ण लढत असल्याचे त्यांनी सांगितले खरे पण प्रचार मात्र जोमात केला. पण निवडणुकीत रंगत आणणाऱ्या आणि बहुरंगी निवडणूक करणाऱ्या प्रहारच्या वाट्याला मात्र केवळ 591 मध्ये आली आहेत. आता दुसऱ्या क्रमांकाची मते किती मिळतात याकडे लक्ष असेल. प्रहारच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांवरून मराठवाड्यात प्रहार निष्प्रभ ठरल्याची चर्चा सुरू झालीये.

मराठवाडा पदवीधर निवडणूक मतमोजणी अपडेट्स

मराठवाडा शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीकच्या मतमोजणीमध्ये महाविकास आघाडीचे विक्रम काळे यांनी 20 हजार 78 पहिल्या पसंतीची मते घेऊन आघाडी मिळवली आहे. दुसऱ्या स्थानावर शिक्षक संघाचे सूर्यकांत विश्वासराव यांनी बाजी मारली असून त्यांना पहिल्या पसंतीची 13543 मते मिळाली आहेत तर तिसऱ्या स्थानावर भाजपाचे किरण पाटील आहेत, त्यांना 13489 पहिल्या पसंतीची मते मिळाली आहेत.

53,257 शिक्षकांनी मतदान केले होते, त्यापैकी 2485 मते बाद झाली आहेत. तर 50,771 मते वैध ठरले आहेत. त्यामुळे विजयासाठी 25,386 मतांचा कोटा ठरवण्यात आलाय. त्यासाठी आता दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करण्यात येणार आहे. दुसऱ्या पसंतीच्या मोजणीनंतरच विजयी कोण होणार हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

अमरावती विभाग पदवीधर मतमोजणी, भाजप उमेदवार रणजीत पाटील पिछाडीवर

अमरावती विभाग पदवीधर मतमोजणी. पहिल्या फेरीत महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे आघाडीवर. विद्यमान आमदार व भाजप उमेदवार रणजीत पाटील पिछाडीवर. तीन वाजेपर्यंत पहिल्या फेरीचा निकाल हाती येण्याची शक्यता.

नाशिक पदवीधर निवडणूक मतमोजणी अपडेट्स

नाशिक पदवीधर निवडणूक मतमोजणी अपडेट्स. मतपत्रिकांचे विलगीकरण पूर्ण. थोड्याच वेळात मतमोजणीला होणार सुरुवात. मतमोजणीच्या ५ फेऱ्या होणार. संध्याकाळपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार.

नागपूर शिक्षक मतदारसंघ, महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले आघाडीवर

नागपूर शिक्षक मतदारसंघ मतमोजणीत १७०० पेक्षा मतं अवैध होण्याची शक्यता आहे. २८ टेबलवरील अवैध मतं मोजण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात. सध्याच्या स्थितीत महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले साधारण तीन हजार पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या कामाचं हे यश- नरेश म्हस्के

ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या विजयावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी म्हटलं की, ही यशाची नांदी आहे. बाळाराम पाटील यांच्या विजयासाठी अनेकजण प्रयत्न करत होते. मात्र मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या कामाचं हे यश आहे. विरोधकांनी यातून बोध घ्यावा.

कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणूक निकाल; भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणूक निकाल; भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

संगमनेरमध्ये सत्यजित तांबे यांच्या विजयाचे बॅनर्स झळकले, बॅनरवर बाळासाहेब थोरातांचाही फोटो

निकालापूर्वीच संगमनेर शहरातही लागले सत्यजित तांबेंच्या विजयाचे फ्लेक्स. सत्यजित तांबे यांच्या शहरात फ्लेक्स लागण्यास सुरुवात. पुण्यानंतर संगमनेरातही सत्यजित तांबे यांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स.विशेष म्हणजे फ्लेक्स वर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचाही फोटो.

कोकण शिक्षक मतदारसंघ मतमोजणीत पहिल्या फेरीत ज्ञानेश्वर म्हात्रे आघाडीवर

मतमोजणीच्या पहिल्या फेरीत ज्ञानेश्वर म्हात्रे आघाडीवर.

महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची आघाडी

प्रत्येक टेबलवर ज्ञानेश्वर म्हात्रे आघाडीवर.

महाविकास आघाडीचे बाळाराम पाटील यांची पीछेहाट.

28 पैकी 19 टेबल क्लीयर.

सर्व 19 टेबल वर ज्ञानेश्वर म्हात्रेची आघाडी.

प्रत्येक टेबलं वर 60 ते 70 टक्के मत ज्ञानेश्वर म्हात्रे यांना मिळाल्याचा अंदाज.

मला २० हजारापेक्षा जास्त मतं मिळतील- ज्ञानेश्वर म्हात्रे

कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची आज मतमोजणी होत असून यामध्ये मला २० हजारापेक्षा जास्त मतं मिळतील, असा विश्वास महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे. सोबतच यंदा पहिल्यांदाच पहिल्या पसंतीच्या मतमोजणीतच निर्णय लागेल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

नाशिक : एकूण 58 पोस्टल मतदान

नाशिक : एकूण 58 पोस्टल मतदान. 12 पोस्टल मतदान अवैध तर 46 पोस्टल मतं वैध. 46 पैकी कोणाला किती हे अद्याप स्पष्ट नाही, मतमोजणी सुरू.

कोकण विभाग विधानपरिषद शिक्षक मतदारसंघ निवडणूक अपडेट

- कोकण मतदार संघासाठी एकूण 98 मतदान केंद्रे होती.

- आतापर्यंत मतपेट्या उघडण्याच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत.

- तिसऱ्या फेरीत मतपेट्या उघडण्यात आल्या आहेत

विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी मतमोजणी

विधान परिषदेच्या नाशिक आणि अमरावती पदवीधर तसेच औरंगाबाद, नागपूर आणि कोकण विभागातील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहेत. आज सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT