MAHARASHTRA MLC ELECTION 2026: MAHYUTI INTERNAL CLASH OVER CANDIDATES INTENSIFIES Saam Tv
महाराष्ट्र

MLC Election : धाराशिव-बीड-लातूर विधानपरिषद निवडणूक जाहीर; भाजपकडून कुणाला मिळणार तिकीट? ही ३ नावे चर्चेत

Dharashiv Beed Jalgaon MLC Election Update : महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून धाराशिव-बीड-लातूर आणि जळगाव मतदारसंघात महायुतीत उमेदवारीवरून चुरस वाढली आहे. अनेक दावेदारांमुळे निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता.

Alisha Khedekar

  • विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

  • महायुतीत उमेदवारीवरून अंतर्गत संघर्ष तीव्र

  • धाराशिव-बीड-लातूर आणि जळगावमध्ये अनेक दावेदार

  • निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून द्यायच्या विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून,त्यामध्ये धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचाही समावेश आहे. या निवडणुकांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १ जून आहे, तर १८ जून रोजी मतदान आणि २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत महायुतीत उमेदवारीवरून मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महायुतीत उमेदवारीवरून चुरस वाढणार आहे. तर जळगावमधून विधान परिषदेच्या एका जागेसाठी महायुतीतील अनेक दावेदार असून भाजप व शिवसेनेत रस्सीखेच होणार असल्याचं चित्र पाहायला मिळणार आहे.

धाराशिव-बीड-लातूर मतदार संघातून भाजपकडून माजी मंत्री बसवराज पाटील,भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी आणि अर्चना पाटील-चाकूरकर यांची नावे आघाडीवर असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे बीड जिल्हा परिषदेची निवडणूक अद्याप झालेली नसतानाही निवडणूक आयोगाने “75 टक्क्यांपेक्षा अधिक मतदार उपलब्ध” या नियमाच्या आधारे हा मतदारसंघ निवडणुकीसाठी पात्र केला आहे.

बीड मतदारसंघात २०१८ मध्ये भाजपचे सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने लढणारे अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांचा ७२ मतांनी पराभव करत विजय मिळवला होता. यावेळीही भाजपसाठी परिस्थिती अनुकूल मानली जात असली तरी अंतर्गत स्पर्धेमुळे समीकरणे बदलू शकतात.

जळगावमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये 'या' उमेदवारांची नावे चर्चेत

जळगावमध्ये देखील विधान परिषदेच्या निवडणुक जाहीर करण्यात आली असून ही निवडणूक तब्बल १० वर्षांनी होणार आहे. विधान परिषदेच्या एक जागेसाठी महायुतीत अनेक दावेदार असल्याने जागा एक दावेदार अनेक असे चित्र निर्माण झाले आहे. भाजपकडून डॉक्टर केतकी पाटील,अमोल शिंदे, नंदकुमार अडवाणी व शिवसेना शिंदे कडून मंत्री गुलाबराव पाटलांचे पुत्र प्रताप पाटील यांचे नाव चर्चेत आहे. एक जागेसाठी अनेक उमेदवार इच्छुक असून भाजप शिवसेनेमध्ये मात्र रस्सीखेच होणार आहे. दरम्यान, महाविकास आघाडीकडूनही उमेदवार देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ही निवडणूक अधिक चुरशीची होणार असून, स्थानिक पातळीवर राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन रुग्णालयात ॲडमिट? नेमकं सत्य काय? प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर

EPFO कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! UPIद्वारे PF होणार ट्रान्सफर; व्हॉट्सअपवर 24x7 सेवा; लवकरच सुरु होणार सुविधा

Ghatkopar Tourism : 'घाटकोपर'मधील विरंगुळ्याचे ठिकाण, मुंबईच्या गजबजाटापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात घालवा निवांत वेळ

Maharashtra News Live Update : जालन्यात गॅस टंचाईचा फटका,पुरीभाजीच्या दरात 10 रुपयांनी वाढ

वजन घटेल अन् पचनक्रियाही सुधारेल! सकाळी रिकाम्या पोटी 'हे' एक फळ खा

SCROLL FOR NEXT