हातात शस्त्र घेऊन व्हिडिओ व्हायरल करणे भोवले; अमरावतीत पोलीस कर्मचारी निलंबित... अरुण जोशी
महाराष्ट्र

हातात शस्त्र घेऊन व्हिडिओ व्हायरल करणे भोवले; अमरावतीत पोलीस कर्मचारी निलंबित...

मात्र पोलीसच अशाप्रकारे व्हिडिओ तयार करून भाईगिरी करत असेल तर आपण काय म्हणावं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अरुण जोशी

अमरावती - हल्ली सोशल मीडियावर Socail Media अनेक जण हातात शस्त्र घेऊन भाईगिरीचे व्हिडिओ Video तयार करून ते व्हायरल Viral करत समाजामध्ये दहशत निर्माण करण्याचं काम करत असतात.असे व्हिडिओ तयार करणाऱ्याच्या मुसक्या देखील पोलीस Police आवळतात मात्र पोलीसच अशाप्रकारे व्हिडिओ तयार करून भाईगिरी करत असेल तर आपण काय म्हणावं असाच एक धक्कादायक प्रकार अमरावती जिल्ह्यात समोर आला आहे.

हे देखील पहा -

जिल्ह्यातील चांदुर बाजार पोलीस स्टेशनचा पोलीस कर्मचारी महेश काळे याने हातात पिस्तूल सारखे शस्त्र घेऊन एक व्हिडिओ तयार केला होता. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याची गंभीर दखल जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन यांनी घेतली असून या कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

महेश काळे या पोलीस कर्मचाऱ्यांनी हातात पिस्तूल सारख्या शस्त्राचा वापर करून व्हिडिओ तयार करून त्याच्यात भाईगिरी सारख्या भाषेचा वापर केला होता. त्याच पार्श्वभूमीवर शासकीय गणेशाचा व शस्त्राचा चुकीच्या पध्दतीने गैरवापर केल्याचा व बेशिस्त व बेजबाबदार वर्तन केल्याचा ठपका त्यांच्यावर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ठेवला असून त्याला आता निलंबित केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंदिरातून कधीही 'या' वस्तू घरी आणू नका; वाईट शक्ती पाठ सोडणार नाही

Thailand Bangkok Shooting : भर बाजारात अंदाधुंद गोळीबार! ६ जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वतःवरही झाडली गोळी

Skin Care Tip: बटाटा लावा आणि चेहऱ्यावर आणा नैसर्गिक तेज!

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील आणखी एक पूल पाण्याखाली

Pune Crime News : पुणे हादरलं !सासरवाडीत जाऊन पतीने केली पत्नीची हत्या; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT