Video Saam Digital
महाराष्ट्र

Video : विधासभेसाठी एकनाथ शिंदेंचा नवा फॉर्म्युला! विद्यमान आमदांसंदर्भात घेतला मोठा निर्णय

Shiv Sena Eknath Shinde/Vidhan Sabha Election : विधानसभेच्या १२६ जागा लढवण्याची तयारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दर्शवली आहे. तसंच राज्यात ११० निरीक्षकही नेमण्यात आले असून उमेदवारीत विद्यमान आमदारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

Sandeep Gawade

विधानसभा निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे, मात्र निवडणुकांचं वारं आतापासूनच वाहू लागलं आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनेही आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली असून १२६ जागा लढवण्याची तायरी दर्शवली आहे. राज्यात ११० निरीक्षकही नेमण्यात आले आहेत. ३ जागांसाठी एक प्रभारी नेमण्यात येणार आहे. तर विद्यमान आमदारांना जागा वाटपात पहिलं प्राधान्य देण्यात येणार असल्याचीही माहिती आहे.

वर्षा बंगल्यावर शिंदे गटाची बैठक पार पडली होती. याआधी विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाने शरद पवार गटाचा फॉर्म्युला उपयोगात आणण्याचं ठरवलं होतं, अशी माहिती सूत्रांनी दिली होती. लिमिटेड जागांवरतीच लक्ष केंद्रित करण्याचा शिंदे गटाचा प्लॅन होता. विधानसभेसाठी 100 जागांची तयारी शिंदे गटाकडून सुरू करण्यात आली होती. बैठकीला शिवसेना पक्षाचे मंत्री, नेते, आमदार, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, प्रवक्ते उपस्थित होते.सू

मात्र आता १२६ जागांवर निवडणूक लढण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपाचं टेन्शन आतापासूनच सुरू झालं आहे. तसंच राज्यात ११० निरीक्षकही नेमण्यात आले आहेत. ३ जागांसाठी एक प्रभारी नेमण्यात येणार आहे. तर विद्यमान आमदारांना जागा वाटपात पहिलं प्राधान्य देण्यात येणार असल्याचीही माहिती आहे. विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात येणार असल्यामुळे ४० जागांची उमेदवारी तुर्तास तरी ठरल्यात जमा आहे. पण महायुतीच्या जागावाटपानंतर यावर शिक्कामोर्तब होईल, अजित पवार, भाजप कोणत्या मतदारसंघावर दावा करतात त्यावर याचं गणित ठरणार आहे.

विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरू आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाने लोकसभेच्या 10 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी ७ जागा निवडून आल्या आहेत. या 10 जागांवर शरद पवार यांनी 100 टक्के लक्ष केंद्रित केलं होतं. तोच फॉर्म्युला शिंदे गट वापरण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT