Vidarbha News Heavy rain Saam tv
महाराष्ट्र

Vidarbha Heavy Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाचा हाहाकार; ४ दिवसांत मृत्यूची धक्कादायक आकडेवारी आली समोर

Vidarbha rains: पश्चिम विदर्भात पावसाचा हाहाकार; ४ दिवसांत २९ जणांचा मृत्यू

Ruchika Jadhav

अमर घटारे

Vidarbha Heavy Rain: पश्चिम विदर्भात (Vidarbha) १८ जुलै ते २२ जुलै या चार दिवसांत अतिवृष्टीने मोठा हाहाकार माजवला आहे. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाने नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानाचा प्राथमिक अहवाल जाहीर केला आहे. या चार दिवसात अंगावर वीज पडून, पुरात वाहून आणि भिंत कोसळून २९ नागरिकांचा मृत्यू झालाय. (Latest Vidarbha Heavy Rain)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ३ लाख ४८८७.८५ हेक्टरवर शेती पिकांचे देखील नुकसान झाले आहे. तर १०३८० घरांची पडझड झाली आहे. तसेच पुरात अडकलेल्या १६५८ कुटुंबातील ५१५६ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते.

धक्कादायक बाब म्हणजे १ लाख ७१ हजार २८ हेक्टर शेत (Farm) जमीन पूर्णपणे खरडून निघाली असल्याने दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर ओढवलं आहे. हा प्राथमिक अहवाल आहे. यात शेतकरी पार खचला असून राज्यात सर्वाधिक आत्महत्या ग्रस्त पश्चिम विदर्भतील आहेत. त्यामुळे विशेष पॅकेज या पश्चिम विदर्भासाठी जाहीर करण्यात यावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

आज मुंबईसह ८ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २६ जुलैपर्यंत पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडणार आहे. आज मुंबईसह ठाण्यातही मुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज हवामान विभागाने दिला आहे. कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागातही अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Divya Deshmukh : गँडमास्टर दिव्या देशमुखचं फडणवीसांकडून कौतुक, व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा

Mumbai Firing : मुंबई हादरली! 32 वर्षीय तरुणीवर गोळीबार, परिसरात खळबळ

Tharवाल्याचा विकृतपणा! आधी कट मारला, नंतर रिव्हर्स घेत वृद्धाच्या अंगावर घातली भरधाव कार|Video Viral

Pune Rave Party : एकनाथ खडसेंचा जावई अडकला की, अडकवला? पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात आता नवा ट्विस्ट

CPR Controversy : महिलेला CPR देणे शिक्षकाला पडलं महागात; चुकीच्या पद्धतीने हात लावल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT