भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण सिंह केसरी यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन
जनसंघाच्या काळापासून ते राजकारणात सक्रिय होते.
भाजपच्या स्थापनेनंतरही त्यांनी पक्षाशी आपली नाळ कायम ठेवली.
मध्य प्रदेश भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी राज्यसभा खासदार नारायण सिंह केसरी यांचे निधन झाले आहे. ते ९२ वर्षाचे होते. नारायण सिंह केशरी यांच्या निधनाच्या वृत्तानंतर राजकीय वर्तुळात शोककळा पसरलीय. भाजप शोकसागरात बुडालीय. जनसंघाच्या काळापासून ते राजकारणात सक्रिय होते. केसरी हे माजी आमदारही होते. ते एक स्पष्ट आणि प्रभावी वक्ते म्हणून ओळखले जात असतं.
नारायण सिंग केसरी यांनी जनसंघाच्या काळापासून संघटनेसाठी काम केले आहे. भाजपच्या स्थापनेनंतरही ते पक्षाशी जोडलेले राहिले. त्यांनी विधानसभेचे सदस्य (आमदार) आणि राज्यसभेचे सदस्य अशा विविध पदांवर काम केले. त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत संघटनात्मक उपक्रम आणि जनसंपर्क यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
भाजपद्वारे जारी करण्यात आलेल्या शोकसंदेशात म्हटलं की, केसरी यांनी आपल्या अथक परिश्रमातून आणि व्यापक प्रवासामधून मध्य प्रदेशसह देशाच्या विविध भागांत अनुसूचित जाती समुदायामध्ये संघटनेचा विस्तार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांना संघर्ष, दृढनिश्चय आणि समर्पणाचे प्रतीक मानत, पक्षनेत्यांनी त्यांच्या निधनाला संघटनेसाठी झालेली मोठी हानी झाली असं म्हटलंय.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लाल सिंग आर्य यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटलंय की, "जनसंघ आणि भाजपचे ज्येष्ठ नेते, प्रभावी वक्ते, तसेच माजी आमदार आणि राज्यसभेचे माजी खासदार नारायण सिंह केसरी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. परमेश्वर दिवंगत आत्म्याला आपल्या चरणी स्थान देवो आणि शोकाकुल कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो."
९२ वर्षीय आदरणीय केसरी-जी हे संघर्ष, दृढनिश्चय आणि समर्पणाचे प्रतीक होते. आपल्या अथक परिश्रमांतून आणि व्यापक प्रवासामधून, त्यांनी केवळ मध्य प्रदेशातच नव्हे, तर संपूर्ण देशात अनुसूचित जाती समुदायांमध्ये संघटनेचा विस्तार करण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या निधनामुळे संघटनेने एक उत्तुंग व्यक्तिमत्व गमावले आहे. 'दादां'च्या चरणी विनम्र श्रद्धांजली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.