Vedanshi Bhosle  Saam TV
महाराष्ट्र

VIDEO: शाब्बास पोरी, तू मन अन् जगही जिंकलं! ३ वर्षांची वेदांशी पोवाडे, गाण्यांंमधून सांगते शिवरायांचा प्रताप!

सर्वात लहान वयात पोवाडे गाण्याचा हा विक्रम तिच्या नावावर आहे.

Prachee kulkarni

पुणे : बालपणात चिऊ- काऊच्या, परिकथेच्या गोष्टी ऐकत आणि भातुकलीचा खेळ खेळत प्रत्येकजण मोठा होतो. पण याच वयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य कथा ऐकून त्यांचे पोवाडे गाणाऱ्या वेदांशी भोसले हिने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रम नोंदवला आहे.

सर्वात लहान वयात पोवाडे गाण्याचा हा विक्रम तिच्या नावावर आहे. अवघ्या ३ वर्षांची ही चिमुकली परदेशात राहून मराठी मातीतील संस्कार न विसरता छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा खड्या आवाजात गाते. (Pune News)

वेदांशी ही मूळची पुण्यातील घोरपडे पेठेतील असून सध्या ती तिच्या आई-वडिलांबरोबर डेन्मार्क येथील ओडेन्स या शहरात राहत आहे. ओडेन्स येथे झालेल्या भारतीय सांस्कृतिक कार्यक्रमात ३ मिनिटे आणि ५८ सेकंदात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा स्तुती पोवाडा तिने गायला आहे.

सर्वात लहान वयात म्हणजेच ३ वर्ष ५ महिने १९ दिवस पोवाडा गाणारी मुलगी म्हणून इंडिया बुकने तिची नोंद घेतली आहे. आई प्रीती भोसले ही गृहिणी आहे आणि वडील संतोष भोसले हे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. वेदांशी ही २ वर्षांची असल्यापासून मराठी कविता, श्लोक, स्तोत्र, आरत्या म्हणते.

संतोष भोसले म्हणाले, परदेशात वडीलधाऱ्या मंडळींच्या अनुपस्थितीत तिला आपले भारतीय संस्कार कसे देता येतील, याचा सतत प्रयत्न आम्ही करीत असतो.

प्रीती भोसले म्हणाल्या, मी वेदांशीला दररोज मराठी भक्ती गीते, भावगीते, श्लोक, गोष्टी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे आणि कथा ऐकवत असे आणि तितकेच मन लावून वेदांशी या सगळ्या गोष्टी ऐकायची आणि त्यांचे अनुकरण करायचा प्रयत्न करायची.

या गोष्टीचा परिणाम तिचे वय वाढत असताना खूप छान झाला आणि त्यामुळेच ती सगळे श्लोक, भावगीते व पोवडा आनंदाने म्हणते, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Madhura Joshi: गुलाबी साडी अन् ओठावर लाली, मधुराच्या सौंदर्याची भलतीच चर्चा

Nandurbar Crime : किरकोळ वादातून भररस्त्यात चाकू हल्ला; तरुणाचा मृत्यू, नंदुरबारमध्ये तणावाचे वातावरण

Shahrukh Khan: शाहरुख खानसाठी मुलगा आर्यन झाला फोटोग्राफर; 'बॅड्स ऑफ बॉलीवूड'च्या स्क्रीनिंगचा VIDEO व्हायरल

High Court: मराठा आरक्षणाच्या GR विरोधात याचिका, न्यायाधीशांनी दिला मोठा निर्णय, कोर्टात नेमकं काय काय झालं?

Maharashtra Live News Update: एमएससीबीच्या वायरमेनच काम करणे शेतकऱ्याच्या जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT