Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होणार? केंद्र सरकारचा मेगाप्लान आला समोर

जागतिक कच्च्या तेलाच्या किमती गेल्या काही महिन्यांत घसरल्या आहेत आणि आता स्थिर आहेत.
Petrol Diesel Latest Price
Petrol Diesel Latest PriceSaam tv
Published On

Petrol Diesel Price : पेट्रोल आणि डिझेलचे वाढलेले दराचा अनेक वस्तूंच्या किंमतीवर परिणाम होतो. तसेच इंधनाच्या वाढलेल्या किमतीचा भार सर्वसामान्यांवर पडला. सरकारकडून पेट्रोल डिझेलचे दर कमी होण्यासाठी काही पावलं उचलली जातील अशी अपेक्षा सर्वांना आहे.

केंद्र सरकारकडून काही उत्पादनांवरील कर कमी केला जाऊ शकतो. रिटेल महागाई कमी करण्यासाठी आरबीआयच्या शिफारशीनुसार सरकार हा निर्णय घेऊ शकते. सरकार मका आणि इंधनावरील कर कमी करू शकते. वृत्तसंस्था रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. फेब्रुवारी महिन्यातील महागाईचे आकडे समोर आल्यानंतरच कोणताही निर्णय घेतला जाईल.

Petrol Diesel Latest Price
घराचा किंवा कारचा EMI थकला तरी पॅनिक होऊ नका; RBI चा हा मोठा प्लान तुमच्यासाठीच, नक्की वाचा!

अन्नधान्याच्या किमती वाढण्याची शक्यता

दूध, मका आणि सोयाबीन तेलाच्या किमती वाढू शकतात. सूत्राने सांगितले की, सरकार मक्यासारख्या उत्पादनांवर आयात शुल्क कमी करण्याचा विचार करत आहे. त्यावर 60 टक्के मूलभूत शुल्क आहे. यावर अर्थ मंत्रालय आणि आरबीआयने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. (Latest News Marathi)

Petrol Diesel Latest Price
Nalasopara Crime News : 'लिव्ह-इन'मधील महिलेची हत्या केली, मृतदेह बेडमध्ये लपवला; पळून जात असताना धावत्या ट्रेनमध्येच...

इंधनावरील कर देखील पुन्हा कमी केला जाऊ शकतो. जागतिक कच्च्या तेलाच्या किमती गेल्या काही महिन्यांत घसरल्या आहेत आणि आता स्थिर आहेत. बुधवारी दुपारी ब्रेंट ऑइल फ्युचर्स 84.32 डॉलर प्रति बॅरलवर घसरत होते. कमी झालेल्या आयात दराचा फायदा अद्याप इंधन कंपन्यांनी ग्राहकांना दिला नाही किंवा कंपन्या त्यांचे जुने नुकसान भरून काढण्यात व्यस्त होत्या.

भारत आपल्या गरजेच्या दोन तृतीयांश तेलाची आयात करतो. केंद्र सरकारच्या कर कपातीमुळे किरकोळ ग्राहकांसाठी किमती कमी करण्यासाठी पंपचालकांवर दबाव येईल. त्यामुळे महागाई कमी होण्यास मदत होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com