Prakash Ambedkar Saam tv
महाराष्ट्र

Prakash Ambedkar: 'युती झाली तर सोबत लढू , अन्यथा...'; प्रकाश आंबेडकर स्पष्टच बोलले

Prakash Ambedkar on india alliance : 'उद्याची ही लढाई... युती झाली तर सोबत लढू, नाही तर आम्ही मोदींना हरवल्याशिवाय राहणार नाही, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे.

Vishal Gangurde

अमर घटारे, अमरावती

Prakash Ambedkar News:

आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध सत्ताधाऱ्यांसहित विरोधी पक्षांना लागले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीत अद्याप प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा प्रवेश होणे प्रलंबित आहे. त्यामुळे इंडिया आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या राजकीय भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. याचदरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी इंडिया आघाडीला मोठा इशारा दिला आहे. 'उद्याची ही लढाई... युती झाली तर सोबत लढू, नाही तर आम्ही पंतप्रधान मोदींना हरवल्याशिवाय राहणार नाही, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. (Latest Marathi News)

वंचित बहुजन आघाडीची अमरावतीत सभा झाली. या सभेत वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यावेळी आंबेडकरांनी देशातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. प्रकाश आंबेडकर म्हणाले, 'एक वर्षाआधी शेतकऱ्यांनी दिल्लीत एक वर्ष आंदोलन केलं. शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा कायदा करा, ही त्यांची मागणी होती. पण ती पूर्ण झाली नाही. मात्र,राज्यात वंचित बहुजन आघाडीचे सरकार आलं तर ती मागणी पूर्ण करू'.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'कापसाला १२ हजार रुपये क्विंटल भाव दिला होता. तेव्हा शर्टचा भाव वाढला नव्हता. आता कापसाचा भाव ५ ते ७ हजार क्विंटल आहे. आधी पणन महामंडळ कापूस खरेदी केल्यानंतर पाचशे रुपये बोनस शेतकऱ्यांना वाटत होतं. तेव्हाचं सरकार शेतकऱ्यांना पाचशे रुपये प्रति क्विंटल बोनस देत होतं, तर आता सरकार का देत नाही? असा सवाल आंबेडकरांनी उपस्थित केला.

'आता युती झाली तर फार चांगलं आहे. आम्ही म्हणतो युती झाली पाहिजे. पण जेलच्या भीतीने युती नको. आम्ही म्हणतो वंचितच्या पाठीमागे उभे राहा. शेतकऱ्यांना कापसामागे प्रति क्विंटल मागे पाचशे रुपये बोनस मिळत होता, ते आम्ही लागू करू, असंही आंबेडकर म्हणाले.

आंबेडकरांची सत्ताधाऱ्यांवर टीका

'आरएसएस, बीजेपी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणामध्ये काही बदल नाही. त्यांच्या काळात सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होत होत्या. आताचे सरकार देखील शासकीय शाळा बंद करून खासगी शाळा आणत आहे. त्यामुळे आपल्याला नुसतं मतदान करायचं नाही, तर ज्यांना आपण मतदान करणार आहोत, ते आपल्या फायद्याचे आहे की नाही ते बघितले पाहिजे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

इंडिया आघाडीवर प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

'युती झाली तर सोबत लढू , नाही तर आम्ही मोदींना हरविल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेस आमच्या सोबत आले, तर पंतप्रधान मोदींना हरवणे सोपे आहे. पण तुम्ही जर आमच्या सोबत आले नाही, तरी आम्ही पंतप्रधान मोदींना हरवू हे लक्षात घ्या. तुम्ही आम्हाला सोबत घ्या, नाही तर राज्यात पंतप्रधान मोदींना हरविण्यासाठी ४८ जागा लढवू, असे ते पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT