Marathi Ukhane
Marathi Ukhane Saam TV
महाराष्ट्र

Marathi Ukhane: असा झक्कास उखाणा घ्या की, पती देईल ७ जन्म साथ

Ruchika Jadhav

Ukhane: वटपौर्णिमेच्या सणाला प्रत्येक स्त्री आपल्या पतीच्या दिर्घआयुष्यासाठी उपवास करते. हिंदू पंचांगातील जेष्ठ महिन्यातील पौर्णिमा वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. पतीला दिर्घायुष्य लाभो यासाठी पत्नी हा उपवास करत असते. (Latets Marathi News)

वटपौर्णिमेच्या दिवशी पौराणिक कथेत दिलेल्या माहितीनुसार,सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी सावित्रीने मोठं व्रत केलं होतं. त्यावेळी तिनं वडाच्या झाडाखाली बसून आपलं हे व्रत पूर्ण केलं. त्यानंतर पती सत्यवानाचे प्राण वाचवण्यात तिला यश मिळालं.

वटपौर्णिमेच्या (Vat Purnima) दिवशी स्त्रिया घरात गोड पदार्थ बनवतात. सकाळी सुंदर अशी साडी नेसून वडाच्या झाडाची पुजा करण्यासाठी निघतात. त्या झाडाला एकून ७ फेरे घेतात. सात जन्म हाच पती मिळावा यासाठी त्यांची ही पूजा असते. अशात शेवटी एकमेकींना हळद कुंकू लावून स्त्रीया उखाणे (Ukhane) घेत हा सण साजरा करतात.

मराठी उखाणे

1) वटपौर्णिमेच्या दिवशी, वडाला फेरे घालते सात... रावांची लाभो मला, जन्मोजन्मी साथ.

2) गुलाबाच्या फुलांपेक्षा, नाजूक दिसते शेवंती.... रावांना मिळो दीर्घायुष्य, हीच देवाला विनंती.

3) तीन वर्षांतून एकदा, येतो अधिकमास... मी वटपौर्णिमेचा उपवास रावांसाठी ठेवला.

4) वटवृक्ष सांगतो, सत्यवान-सावित्रीचा इतिहास.... रावांचे नाव घेते, वटपौर्णिमेसाठी खास

5) वडाची पूजा करून, मागितले दीर्घायुष्याचे दान.... रावांसोबत, मी संसार करीन छान

6) वडाच्या झाडाला घातल्या, प्रदक्षिणा एकशे आठ... रावांसोबत बांधली, मी जन्मोजन्मीची गाठ

7) रामाने सीतेसाठी, उचलले शिवधनुष्य... रावांसाठी मागते, देवाकडे दीर्घायुष्य

8) वटपौर्णिमेला आहे, वडाला खूपच महत्त्व... रावांची वाढत राहो, कीर्ती आणि कर्तृत्व

9) पतिव्रता धर्माचा, सावित्री आहे आदर्श... रावांचे नाव घेताना, होतो खूपच हर्ष

10) वटपौर्णिमेचे व्रत, निष्ठेने करते... रावांसाठी मी, दीर्घायुष्य मागते

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Poco X6 5G नविन अवतारात लॉन्च झाला, मिळणार जबरदस्त फीचर्स

Farmers Protest: पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, 3 दिवस 46 गाड्या रद्द; 100 मार्ग बदलले

Gadchiroli Crime: धक्कादायक! जादूटोणाच्या संशयातून गावकऱ्यांनी महिलेसह दोघांना जिवंत जाळलं

Maharashtra Politics: प्रणितीसह सुशीलकुमार शिंदे भाजपच्या वाटेवर? प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

MI vs KKR, IPL 2024: मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात! घरच्या मैदानावर मुंबईचा KKR कडून लाजिरवाणा पराभव

SCROLL FOR NEXT