Vasai Flood Saam tv
महाराष्ट्र

Vasai Flood : वसईच्या बैठ्या चाळीत पुरात अडकले नागरिक; ३० जणांची सुखरूप सुटका

Vasai Virar News : जोरदार पाऊस सुरु असल्याने सखल भागात पाणी साचले आहे. परिणामी पूरस्थिती निर्माण झाली असून वसई पूर्वेच्या भोयदापाडा - राजावळी परिसरातील चाळीत पावसाचे पाणी शिरले

Rajesh Sonwane

मनोज तांबे 
वसई
: जोरदार पाऊस होत असून वसई विरार शहरात देखील मुसळधार सुरू आहे. या पावसामुळे शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान पुराच्या पाण्यात वसई भोयदापाडा राजावळी येथील बैठ्या चाळीत पुराचे पाणी शिरल्याने येथील नागरिक पुरात अडकले होते. पुरात अडकलेल्या ३० नागरिकांची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

राज्यातील बहुतांश भागात पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर यासह वसई- विरार परिसरात देखील जोरदार पाऊस सुरु असल्याने या शहरांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान वसई पूर्वेच्या भोयदापाडा - राजावळी परिसरात मोठ्या प्रमाणात चाळी आहेत. याच चाळीत पावसाचे पाणी शिरले असल्याने नागरिकांना येथून बाहेर निघणे शक्य नव्हते.  

३० जणांना रेस्क्यू करत काढले बाहेर 

वसईच्या बैठ्या चाळीत जवळपास तीस हुन अधिक नागरिक अडकून पडले होते. याची माहिती वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी पोहचून तातडीने त्यांना रेस्क्यू करण्याचे काम सुरू केले आहे. आतापर्यंत या चाळीतून ३० नागरिकांना सुखरूप बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली आहे.

पनवेलमध्ये अतिवृष्टीचा इशारा, ३१८ नागरिकांचे स्थलांतर

पनवेल : पनवेल शहरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. संभाव्य अतिवृष्टी लक्षात घेऊन महापालिकेकडून ३१८ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. कोळीवाडा, भारत नगर झोपडपट्टी व पटेल मोहल्ल्यातील १२५ नागरिकांना कोळीवाडा शाळेत, तर १३३ नागरिकांना उर्दू प्राथमिक शाळेत स्थलांतरीत करण्यात आले आहे. तसेच ६० नागरिकांना क्रीडा संकुलात हलविण्यात आले आहे. स्थलांतरित नागरिकांसाठी चहा, जेवण, आरोग्य सेवा व पाण्याची सोय महापालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय वैद्यकीय विभागाच्यावतीने आरोग्यसेवा त्वरित सुरू करण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : ठाकरे-शिंदेच्या दसरा मेळाव्यामुळे मुंबईत वाहतुकीत बदल, पाहा पर्यायी मार्ग कोणते?

Maharashtra Live News Update: पंढरपुरात चंद्रभागा नदीने इशारा पातळी गाठली; नदीकाठी पूरस्थिती

GK: भारतातील कोणते शहर 'सायकल सिटी' म्हणून ओळखले जाते? जाणून घ्या

Railway Recruitment: रेल्वेत नोकरीची संधी; २५७० पदांसाठी भरती जाहीर; अर्ज कसा करावा?

Dharashiv Farmers : कर्जवसुलीला तात्पुरती स्थगिती, अनुदान थेट खात्यात जमा होणार, शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाचा दिलासा

SCROLL FOR NEXT