Vasai Crime News Saam tv
महाराष्ट्र

Vasai Crime News: वसईत एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पोलीस येताच चोर पळाले

वसईत एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पोलीस येताच चोर पळाले

चेतन इंगळे

वसई : वसईत एसबीआय बॅंकेेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी पहाटे साडेतीनच्या (Vasai) सुमारास घडली आहे. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस (Police) घटनास्थळावर गेले. मात्र अज्ञात चोर त्यापूर्वीच पसार झाले. (Maharashtra News)

वसई पुर्वेच्या गोलानी नाका येथील दीप टॉवर इमारतीत शॉप नंबर १३ मध्ये एसबीआय बॅंकेचे एटीएम केंद्र आहे. पहाटे साडेतीनच्या सुमारास काही अज्ञात चोर एटीएम (ATM) फोडण्याचा प्रयत्न करत होते. कटरच्‍या सहाय्याने मशिन कापत होते. याबाबत कंट्रोल रुमला स्थानिकांनी माहिती दिली. यानंतर वालीव आणि नायगाव पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळावर रवाना झाले.

पोलिस आले त्‍यापुर्वीच..

पोलीस येत असल्याची कुणकुण लागताच चोर पसार झाला. अज्ञात चोरांनी एटीएमचे शटर बाहेरून बंद करून कटरच्या सहाय्याने एटीएम फोडत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. मास्क लावलेला एक चोर एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात दिसत आहे. पोलीस या चोरांचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विरार - दादर लोकल ट्रेनमध्ये माथेफिरूचा धुमाकूळ; रेल्वे प्रवासी महिलांची सुरक्षा वाऱ्यावर

IND vs PAK : पाकिस्तानविरोधात खेळावं की नाही, टीम इंडिया संभ्रमात, गौतम गंभीर म्हणाला...

Beed : जामीनावर सुटताच स्वागतासाठी फटाक्यांची आतिषबाजी; बीड शहरातील धक्कादायक प्रकार

Dashavatar Collection : बॉक्स ऑफिसवर 'दशावतार'चा बोलबाला; दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयानं केली जादू, २ दिवसांत कमावले तब्बल 'इतके' कोटी

गोविंद बर्गे प्रकरणात मोठा ट्विस्ट; माजी उपसरपंचांकडून पूजाला साडेसात लाख रूपयांची भेटवस्तू

SCROLL FOR NEXT