ardhapur, nanded , accident , truck , varsha madne saam tv
महाराष्ट्र

Accident News : भरधाव ट्रक घरात घुसला; युवती ठार

या घटनेचा पाेलीस तपास करीत आहेत.

संतोष जोशी

Nanded Accident News : नांदेड (nanded) जिल्ह्यात ट्रक घरात घुसून झालेल्या दुर्घटनेत (accident) एका युवतीचा मृत्यू झाला आहे. या घटनेत घरासह रस्त्यावरील तीन दुचाकींचही मोठं नुकसान झाले आहे. दरम्यान या घटनेमुळं युवतीच्या कुटुंबियांना माेठा धक्का बसला आहे.

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथे आज सकाळी ही घटना घडली आहे. चालकाचे ट्रकवरील निमंत्रण सुटल्याने थेट ट्रक रस्त्यालगत असलेल्या घरात घुसला. या घराच्या अंगणात युवती तोंड धुवत असताना ट्रक अचानक तिच्या अंगावर गेला. यामध्ये युवतीचा मृत्यू झाला.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार वर्षा माणिक मदने (Varsha Madne) असं मृत झालेल्या तरुणीचं नाव आहे. दरम्यान वर्षा या ट्रकखाली चिरडली गेल्या. या ट्रकनं उभ्या असलेल्या तीन दुचाकींना ही धडक दिल्याने दुचाकींचही मोठं नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पाेहचले. तेथे पाेलिसांनी पंचनामा केला. या प्रकरणी ट्रक चालका विरोधात अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पाेलीस तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

US-Iran War: अमेरिका इराणवर अणुबॉम्ब टाकणार? ट्रम्प यांचा बेचिराख करण्याचा प्लॅन?

PSL मध्ये मोठी दुर्घटना! फलंदाजानं मारलेला फटका आला जिवाशी; डोक्याला चेंडू लागताच खेळाडू मैदानावर कोसळला

Nagpur : संघ मुख्यालयाजवळ स्फोटकं, 15 जिलेटिन कांड्या, 58 डिटोनेटर जप्त

ओव्हरटेकच्या नादात जीव गेला; बसखाली चिरडून दोघांचा मृत्यू, अपघाताचा थरार CCTVमध्ये कैद

Maharashtra News Live Update: चांदवडच्या राहुडमध्ये घरफोडी, लग्नासाठी ठेवलेले सुमारे 20 तोळे सोनं आणि रक्कम लंपास

SCROLL FOR NEXT