pandharpur, islampur, sambhaji bhide, aandolan, morcha saam tv
महाराष्ट्र

Sambhaji Bhide Controversial Statement : संभाजी भिडेंना अटक करा, इस्लामपुरात बंद; पंढरपुरात जोडे माराे आंदोलन

वाळवा तहसील कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढून संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

Siddharth Latkar

- विजय पाटील / भारत नागणे

Sambhaji Bhide News : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे (shiv pratishthan hindustan chief sambhaji bhide) यांनी महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध नाेंदविण्यासाठी आज (शुक्रवार) इस्लामपूर बंद ठेवण्यात आले आहे. याबराेबरच येथे विविध संघटनाकडून निषेध मोर्चा काढण्यात आला आहे.  (Maharashtra News)

विविध संघटना माेर्चात सहभागी

इस्लामपूर शहरातील आजच्या निषेध मोर्चात दलित महासंघ, संभाजी ब्रिगेड, विद्रोही चळवळ, शिवशंभो प्रतिष्ठान, मराठा सेवा संघ, छावा मराठा युवा महासंघ, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, महात्मा फुले विचार मंच, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भारतीय क्रांति दल या संघटना सहभागी झाल्या आहेत. या सर्व संघटनांनी वाळवा पंचायती समितीतून वाळवा तहसील कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढून संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

इस्लामपूर शहर बंदला अल्प प्रतिसाद

शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ विविध पक्ष आणि संघटनाकडून इस्लामपूर शहर बंदची आज हाक देण्यात आली होती. या बंदला शहरातून अल्प प्रतिसाद मिळालेला दिसून आला.

पंढरपुरात भिडेंच्या विरोधात आंदोलन

पंढरपूरात आज (शुक्रवार) मनोहर (संभाजी) भिडे यांच्या वक्तव्याच्या आणि मणिपूरच्या घटनेचा निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भिडेंना तात्काळ अटक करावी तसेच मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी आंदाेलकांनी केली.

यावेळी केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. भिडेंच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेड, रिपब्लिकन सेना यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिक- मुंबई महामार्गावरील उड्डाण पुलावर कारला भीषण अपघात

SSC HSC Student: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; बोर्डाने घेतला मोठा निर्णय

Accident : हृदयद्रावक! काही दिवसांवर लग्न, पत्रिका वाटण्यासाठी जाताना भरधाव कारने चिरडले; नवरदेवासह दोघांचा मृत्यू

Ashok Kharat Case: अशोक खरातचं आणखी एक नवं कांड, उरणमध्ये ४ कोटींची जमीन फक्त ५८ लाखांत खरेदी

Ladki Bahin Yojana: या दिवशी लाडकीच्या खात्यात ₹३००० जमा होण्याची शक्यता; मार्च-एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT