Uddhav Thackeray, vangaon police, zp member jayendra dubla, dahanu saam tv
महाराष्ट्र

Palghar News : ठाकरे गटातील अंतर्गत वाद पुन्हा उफाळला; पंचायत समिती उपसभापतींवर हल्ला, झेडपी सदस्यांवर गुन्हा दाखल

या घटनेचा पाेलिस तपास करीत आहेत.

रुपेश पाटील

Palghar News : जलजीवन मिशनच (jal jeevan mission) काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारीनंतर पाहणी करण्यासाठी गेलेल्या डहाणूच्या ठाकरे गटाच्या पंचायत समिती उपसभापतींवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. याबाबत पिंटू गहला यांनी पाेलिसांत तक्रार नाेंदवली आहे. (Maharashtra News)

डहाणू पंचायत समितीचे उपसभापती पिंटू गहला आज अधिकाऱ्यांसह जलजीवन मिशनच्या कामाची पाहणी करण्यासाठी डहाणूतील विरे या गावात गेले. मात्र त्यांच्यावर अचानक काही जणांनी हल्ला चढवला.

या हल्ल्यात पिंटू गहला यांना जबर दुखापत झाली. त्यांच्यावर डहाणूतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान हा हल्ला उद्धव ठाकरे गटाचे (uddhav thackeray faction) जिल्हा परिषदेचे सदस्य जयेंद्र दुबळा (zp member jayendra dubla, dahanu) यांनी करवल्याचं पोलीस जबाबात पिंटू गहला यांनी सांगितले.

पाेलिसांनी गहला यांच्या तक्रारीवरुन जिल्हा परिषदेचे सदस्य जयेंद्र दुबळा यांच्यासह काही जणांवर गर्दी जमवून मारहाण केल्या प्रकरणी वानगाव पोलीस ठाण्यात (कलम 143,147,323,324.109.504.505) गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पाेलिस तपास करीत आहेत.

दरम्यान या घटनेमुळे पालघर मधील ठाकरे गटातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई आघाडीवर

Chopda Vidhan Sabha : निवडणुकीचे काम टाळणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांवर गुन्हा; विनापरवानगी राहिले गैरहजर

Assembly Election Results 2024 : राज्यात कोणाचं सरकार येणार? सुरुवातीच्या कलात महायुती आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: बहुमताचा आकडा गाठला, सुरुवातीचा कल महायुतीकडे, भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत!

Cleaning Tips: ब्लँकेट रजाईला दुर्गंधी येते का? हे उपाय एकदा करून बघा

SCROLL FOR NEXT