Pandharpur Saam Tv
महाराष्ट्र

Kartiki Ekadashi Yatra Pandharpur : विठुरायाला अकरा लाखांचा सोन्याचा चंदनहार अर्पण

कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या देणग्यांमध्ये चांगली वाढ झाली आहे.

भारत नागणे

Pandharpur News : कार्तिकी यात्रेच्या (kartiki yatra) निमित्ताने पंढरपूरातील विठुरायाच्या खजिन्यात विविध सोने चांदीच्या दागिन्यांची भर पडली आहे. कल्याण (Kalyan) येथील विठ्ठल भक्त वंदना म्हात्रे यांनी अकरा लाख रुपये किंमतीचा एकाेणीस तोळे वजनाचा सोन्याचा चंदनहार‌ विठुरायाला नुकताच अर्पण केला आहे. (Kartiki Ekadashi Latest Marathi News)

कल्याण येथील विठ्ठल भक्त वंदना म्हात्रे या पंढरपूरात (pandharpur) सहकुटुंब आल्या हाेत्या. त्यांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यापुर्वी मंदिर समितीच्या व्यवस्थापकांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी विठ्ठलाच्या चरणी साेन्याचा चंदन हार अपर्ण करण्याची भावना व्यक्त केली. (Maharashtra News)

अत्यंत सुबक कलाकुसर असलेला सोन्याचा चंदन हार आज म्हात्रे कुटुंबियांनी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर हा हार विठ्ठलास अर्पण करण्यात आला. यावेळी भरत महाराज अलिबागकर, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर आदी उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon : अंगावर काटा आणणारी घटना! विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

Chief Minister Salary : राज्याच्या मुख्यमंत्र्यांना किती पगार मिळतो?

Maharashtra Rain Live News : तीन दिवसानंतर मुंबईत आता पावसाची विश्रांती

Madison Square Garden: न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर 'भारत माता की जय' आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमलं

Nandurbar : बस कंडक्टरकडून विद्यार्थिनींना शिवीगाळ; नंदुरबार बसस्थानकावरील प्रकार, कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT