Prakash Ambedkar-Uddhav Thackeray Saam TV
महाराष्ट्र

Prakash Ambedkar: निकाल काहीही लागला असला, तरी...'; निकालानंतर प्रकाश आंबेडकरांचं उद्धव ठाकरेंना मोठं आवाहन

Prakash Ambedkar reacts on MLA Disqualification Result: 'शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल काहीही लागला असला, तरी या प्रवृत्तीविषयी आपण मिळून लढू, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंना केलं आहे.

Vishal Gangurde

सचिन जाधव, पुणे

Prakash Ambedkar on MLA Disqualification Result :

आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल शिंदे गटाच्या पारड्यात पडला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं, मात्र खरी शिवसेना एकनाथ शिंदेंची आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. राहुल नार्वेकरांनी निकाल दिल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. 'शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल काहीही लागला असला, तरी या प्रवृत्तीविषयी आपण मिळून लढू, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंना केलं आहे. (Latest Marathi News)

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले,'राहुल नार्वेकरांनी जो निकाल दिला, त्याच्यामुळे युतीमधील आमचे मित्रपक्ष उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे. अपेक्षा होती की, खरा निकाल लागेल मात्र, खरा निकाल लागला नाही. उद्धव ठाकरे यांच्याप्रती आम्ही सहानुभूती व्यक्त करतो'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'ज्या दिवशी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत नाव आणि चिन्ह कायम ठेवण्याची परवानगी दिली, त्याच दिवशी शिवसेना( UBT) यांची हार झाली होती. आज फक्त औपचारिकता बाकी होती. आम्हाला उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आहे, असे त्यांनी म्हटलं आहे.

निकालावर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर आमदार बच्चू कडू यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. 'प्रचंड मेहनत आणि काम एकनाथ शिंदे यांचं आहे. 56 पैकी 40 आमदार शिंदेंकडे आहे, त्यामुळे शिवसेना शिंदेंकडे आहे त्यावरून स्पष्ट होते. निकालामध्ये संतुलन ठेवलं आहे. कोणालाही नाराज न करता आपआपल्या ताकदीवर लढा असा त्याचा उद्देश आहे,असे बच्चू कडू म्हणाले.

'संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करताना आपल्यामध्ये काय दोष आहे हे तपासणे गरजेचे आहे, कुठलीही गोष्ट एकतर्फी पाहता कामा नये, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Voter ID: दोन मतदार ओळखपत्र आहेत? होऊ शकते जेल; कारण काय? जाणून घ्या

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण, पाहा सोन्याचा आजचा भाव

School Holiday: मतदान केंद्र असलेल्या पालिकेच्या शाळांना उद्या सुट्टी, तर शिक्षण आयुक्त म्हणतात उद्या शाळा सुरु राहणार

Nayanthara Lovestory: विवाहीत प्रभूदेवाच्या प्रेमात आकंठ बुडाली होती नयनतारा, धर्मही बदलला मात्र नातं फार काळ टिकलं नाही....

SCROLL FOR NEXT