Prakash Ambedkar Saam tv
महाराष्ट्र

Prakash Ambedkar : अजित पवार गटासोबत युती करणार का? प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं

Prakash Ambedkar on ajit pawar : प्रकाश आंबेडकरांनी हिंगोलीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी तिसऱ्या आघाडीवर मोठं भाष्य केलं.

संदीप नागरे, साम टीव्ही, हिंगोली

हिंगोली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती दोन मोठ्या राजकीय आघाड्या आहेत. त्यानंतर आता काही राजकीय नेत्यांनी तिसऱ्या आघाडीची चाचपणी सुरु केली आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने तिसऱ्या आघाडीची चाचपणी सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या चर्चेदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी तिसऱ्या आघाडीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी हिंगोलीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. तिसऱ्या आघाडीच्या माध्यमांतून अजित पवारांसोबत युती करणार का, यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, अजित पवार हे जोपर्यंत भाजपसोबत आहेत. तोपर्यंत तिसरी आघाडी शक्य नाही'.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर भाष्य करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, 'मनोज जरांगे पाटील यांचा आजपासून उपोषण सुरू झालं आहे. यावर प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना सल्ला दिला आहे. जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या 288 जागा लढवण्याचा घोषणा केली आहे. त्यांनी तयारीला लागले पाहिजेत. त्यांनी त्यांच्या घोषणेची पूर्तता केली पाहिजे'.

पूजा खेडकर प्रकरणावरही प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केलं. 'कुणी कायदा मोडला असेल, तर न्यायालय बघेल. कुणीही भूमिका घेण्याची गरज नाही'.

शरद पवारांची मराठा आरक्षणाबाबत भूमिका काय? वंचित बहुजन आघाडीचा सवाल

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीने शरद पवारांना सवाल केला आहे. 'शरद पवार, राज्य सरकार 2 महिन्यांचे आहे. मनोज जरांगे यांची मागणी आहे की, मराठा आरक्षण ओबीसी कोट्यातून द्या. यावर आपली आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांची काय भूमिका आहे? ती स्पष्ट करावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सातारा जिल्ह्यातील काँग्रेसला खिंडार; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय भाजपच्या वाटेवर

फिटनेस-कॅलरी बर्नसाठी घरातच करा 10,000 स्टेप्स वर्कआऊट; जाणून घ्या न्यूट्रिशनिस्टचा सल्ला

Wednesday Horoscope : गुप्त शत्रूंचा त्रास वाढणार, पैशांबाबत घ्यावी लागणार काळजी; 5 राशींच्या लोकांनी जपून राहा

Maharashtra Live News Update: पुण्याच्या जुन्नरमधील बिबट्या शिफ्ट करणार

Best Playing 11 : आश्चर्याचा धक्का! हरमनप्रीत कौरला संघातूनच काढलं, आयसीसीनं बेस्ट टीमचं कर्णधारपद दिलं भलत्याच खेळाडूकडं

SCROLL FOR NEXT