Walmik karad Saam tv
महाराष्ट्र

Walmik karad : कोठडीत पहिल्याच दिवशी वाल्मीक कराडची प्रकृती बिघडली; श्वास घ्यायला अडचणी, रात्री नेमकं काय झालं?

Walmik karad latest News : कोठडीत पहिल्याच दिवशी वाल्मीक कराडची प्रकृती बिघडल्याची घटना घडली आहे. झोपण्यापूर्वी त्याला कृत्रिम ऑक्सिजनचा आधार घ्यावा लागला. वाल्मिक करडाला १४ दिवसांची कोठडी मिळाली आहे.

Vishal Gangurde

बीड : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात वाल्मीक कराडला अटक करण्यात आली आहे. वाल्मीक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण गेला. त्यानंतर पोलिसांनी अटक केली. त्यानंतर तातडीने वाल्मीक कराडला वैद्यकीय चाचणी करून कोर्टात हजर केलं. यावेळी कोर्टाने त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे नववर्षाची सुरुवात पोलीस कोठडीपासून सुरुवात झाली. त्यानंतर पोलीस कोठडीत पहिल्याच दिवशी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली.

वाल्मीक कराडला कोर्टाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पहिल्याच दिवशी त्याची तब्येत बिघडली. पहिल्याच दिवशी कोठडीत ऑक्सिजन लावून झोपी गेला. वाल्मीक कराड हा रात्री १.४५ वाजता कोठडीत आला होता. त्यानंतर सकाळी ८.३० वाजता उठला. त्याने सकाळी चहा घेतला नाही. त्यानंतर ११.४५ वाजता अर्धी पोळी खाल्ली. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता थोडा भात खाईल, असे सांगितले. रात्री डॉक्टर येऊन गेले होते. तेव्हा तब्येतीची कोणतीही तक्रार नव्हती.

बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राजकारण ढवळून निघालं आहे. या प्रकरणातील वाल्मिक कराड हा पुण्यातील सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण आला. त्यानंतर रात्री वाल्मिकला बीडच्या केजमधील न्यायायलयात हजर करण्यात आलं. यावेळी झालेल्या सुनावणीत वाल्मिक कराड यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

वाल्मिक कराडची चौकशी सुरु

बीडमधील खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याची सीआयडीकडून चौकशीला झाली. वरिष्ठ सीआयडी अधिकाऱ्यांनी चौकशी केली. खंडणी प्रकरणातील फरार असलेला आरोपी संदर्भात सीआयडीकडून विचारणा करण्यात आली. आज बुधवारी दिवसभर सीआयडीकडून चौकशी होणार आहे. कोण कोणते विषय उलगडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

सीयआडीचं आता कोणावर लक्ष?

सीआयडीचा फोकस आता सुदर्शन घुलेवर लक्ष आहे. सुदर्शन घुले हा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. हत्येच्या गुन्ह्यातील तीन आरोपीच्या CID मुसक्या आवळणार आहेत. सुदर्शन घुले हा महाराष्ट्रातच असण्याची शक्यता आहे. तर कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे दोन आरोपी राज्याबाहेर असल्याचा संशय आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघे जण फरार आहेत. वाल्मिक कराडनंतर तपास यंत्रणांचं लक्ष तीन फरार आरोपींवर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

SCROLL FOR NEXT