Valentine Day Saam Tv
महाराष्ट्र

Valentine Day: व्हॅलेंटाइन डेला प्रेम बहरणार! मावळातील फुलं थेट परदेशात; २५ ते ३० लाख फुलांची निर्यात

Maval Roses Export In Abroad: व्हॅलेंटाइन डेला अवघे काही दिवस उरले आहेत. बाजारात गुलाबांच्या फुलांची मागणी वाढत आहे. दरम्यान, मावळातील गुलाब आता परदेशात निर्यात केले जाणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिलीप कांबळे, साम टीव्ही प्रतिनिधी

व्हॅलेंटाइन डे आठवड्यावर येऊन ठेपला आहे. या दिवशी प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी गुलाबाच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. ही फुले पुरवण्यासाठी मावळातील गुलाब फूल उत्पादक शेतकऱ्यांची मोठी लगबग सुरू झाली आहे. मावळातील गुलाबांना विदेशात मोठी मागणी आहे. या वर्षी व्हॅलेंटाइन डेला संपूर्ण मावळातून 25 ते 30 लाख फुलांची निर्यात होणार आहे.

मावळातील गुलाब व्हॅलेंटाईन डे साठी परदेशात जाण्यासाठी सज्ज झाला आहे. यावर्षी मागणी कमी झाल्याने दरात घसरण झाली आहे. थंडीचे प्रमाण कमी झाल्यामुळे स्थानिक बाजारपेठेत गुलाब विकावा लागला . (Valentine Day)

व्हॅलेंटाइन डे अर्थात 14 फेब्रुवारीला देश-विदेशातून गुलाबाच्या फुलांना मोठी मागणी असते. या दिवसाच्या पार्श्वभूमीवर मावळातील फूल उत्पादक शेतकरी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून कामाला सुरुवात करतो. 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी हा जागतिक बाजारपेठेत फुलांची निर्यात होण्याचा कालावधी असतो.

यावर्षी मात्र आमचं प्लॅनिंग चुकलं. यावर्षी खूप पाऊस झाला मात्र थंडीत पडली नाही याचा परिणाम फुल उत्पादनावर झालं. जे फुल 50 ते 55 दिवसानंतर येणार होतं. ते फुल 40 दिवसातच उमललं त्यामुळे फुल निर्यात करण्यावेळे अगोदरच मोठ्या प्रमाणात उत्पादन झालं. लवकर फुल उमलले त्यामुळे या फुलांची विक्री मिळेल त्या भावात लोकल मार्केटमध्ये करावे लागेल,असं शेतकऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी नुकसान झाले आहे.

यावर्षी ऑस्ट्रेलिया, जपान, न्यूझीलंड, सिंगापूर, दुबई, या परदेशात गुलाब फुले पाठवणार आहे. यावर्षी आम्हाला प्रति 16 रुपये असा रेट मिळालेला आहे. यावर्षी आमच्या शेतातून 12 ते 15 लाख गुलाब फुलांची निर्यात केली जाणार आहे.

ज्याप्रमाणे दिवाळी साजरी करतो त्याचप्रमाणे आमच्यासाठी व्हॅलेंटाईन डे सुद्धा सन आहे. आम्ही जी गुलाबाची फुले निर्यात करण्यासाठी तयार करतो ती फुले प्रेमाचे प्रतीक म्हणून एकमेकांना ज्यावेळेस देतात त्यात एक वेगळाच आनंद असतो, अशा शब्दात शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विधान परिषदेची जागा भाजपनेच लढवावी, आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Fact Check: २५५० रुपये द्या अन् ५ लाख घ्या, PM मोदींच्या नावाने मिळतंय कर्ज? सरकारने दिली महत्वाची माहिती

देशाच्या राजकारणात खळबळ; राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री देणार राजीनामा?

Ind vs Afg : भारताविरुद्ध वनडे, कसोटीसाठी टीम अफगाणिस्तान जाहीर; हुकमी एक्का संघाबाहेर

Shahi paneer Recipe: घरच्या घरी बनवा स्वादिष्ट शाही पनीर; पाहुण्यांनाही आवडेल खास रेसिपी

SCROLL FOR NEXT