Vaishnavi Hagawane Dowry Harassment Case Updates: 
महाराष्ट्र

Vaishnavi Hagawane : नवरा माझा झालाच नाही; आत्महत्येपूर्वीची वैष्णवीची दुसरी ऑडिओ क्लिप व्हायरल

Vaishnavi Hagawane Dowry Harassment Case Updates: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवीने कुटुंबीयांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. आता वैष्णवीची नवी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

Bharat Jadhav

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवीने आत्महत्या केल्यानं पुन्हा एकदा हुंडा पद्धत चर्चेत आलीय. हुंड्यासाठीचा छळ, कौटुंबिक हिंसाचार होत असल्यानं वैष्णवीने आत्महत्या केली. या प्रकरणी वैष्णवीचे सासरे आणि दीर हे दोघंही फरार आहेत. दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी वैष्णवीने आपल्या मैत्रिणीशी फोनवर संवाद साधला होता. या फोनची ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय. यात तिने आपल्याकडून मोठी चूक झाल्याचं म्हटलंय.

पुण्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम येथे १६ मे २०२५ रोजी वैष्णवी शशांक हगवणे या २३ वर्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली होती. वैष्णवी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून होती. वैष्णवीच्या मृत्यूमुळे राज्यभरात खळबळ उडालीय. सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी वैष्णवीचा मानसिक आणि शारीरिक छळ केला.

लग्नाच्या वेळी ५१ तोळे सोने, एक फॉर्च्युनर कार आणि इतर महागड्या वस्तू दिल्या होत्या. पण नंतरही पैशांची मागणी करण्यात आली. तिला घरातूनही बाहेर काढण्यात आलं होतं. वारंवार होणारा छळ सहन न झाल्याने तिने आत्महत्या केली, असल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केलाय. दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी वैष्णवीने आपल्या मैत्रिणीसोबत फोनवर संवाद साधला होता. त्यात तिने तिच्यावर होणाऱ्या कौटुंबिक छळाची माहिती दिली.

आपण सर्वांचा विरोध करून हगवणे कुटुंबात आली तीच मोठी चूक केली असं वैष्णवी आपल्या मैत्रिणीला म्हणते. मी सगळ्यांच्या विरोधात जाऊन लग्न केले ही माझी मोठी चूक झाली अस वैष्णवी फोनवर बोलत आहे.

काय आहे ऑडिओ क्लिप

हुंड्यामुळे वैष्णवीने आत्महत्या केल्यानं हे प्रकरण राज्यभराच चर्चेत आले आहे. त्यानंतर वैष्णवीच्या कथित ऑडिओ क्लिप समोर येत आहेत. काल एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आज पुन्हा एक नवीन क्लिप व्हायरल झालीय. माझा नवरा माझा कधी झालाच नाही, याचे मला खूप वाईट वाटते. सासू-सासऱ्यांचं त्यांचे कामच असतं असं वागणं. पण माझा नवरा माझा झाला नाही. 'मी सगळ्यांविरोधात जाऊन लग्न केलं ना तीच मोठी चूक मी केली असल्याचं वैष्णवीने आपल्याला मैत्रिणीला फोनवर सांगितलं. या ऑडिओ क्लिपमध्ये वैष्णवी नणंदचाही उल्लेख केलाय. नणंदने मला खूप वाईट बोललंय, असंही ती यात म्हणतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: बायकोचं शिर धडावेगळं केलं, नंतर शरिराचे १७ तुकडे करत...; आयुष्यभर साथ देण्याचं वचन देणाऱ्या नवऱ्याचा क्रूर चेहरा समोर

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घरात होणार पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री? स्पर्धकाचे नाव वाचून बसेल धक्का

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Pratapgad Fort History: ऐतिहासिक शौर्य, भव्य वास्तुकला असलेले प्रतापगड; जाणून घ्या इतिहास आणि वैशिष्ट्ये

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते नव्या बसांना हिरवा झेंडा

SCROLL FOR NEXT