Vaishnavi Hagawane Death Case  
महाराष्ट्र

Vaishnavi Hagawane Death Case: माझ्या नवऱ्यासह मलाही मारलं, मोठ्या सुनेचे धक्कादायक आरोप; फोटो व्हायरल

Vaishnavi Hagawane Death Case Update: वैष्णवीची मोठी जाऊ मयुरी यांनीदेखील हगवणे कुटुंबावर धक्कादायक आरोप केलेत. शशांकने आपल्यालाही मारहाण केली असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

Bharat Jadhav

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होतेय. वैष्णवी आत्महत्या प्रकरणी अजित पवार गटाचे पदाधिकारी राहिलेले राजेंद्र हगवणे, त्यांचा धाकटा मुलगा शशांक हगवणे, त्याची बहीण आणि आई यांच्याविरोधात तक्रार दाखल झालीय. तक्रार दाखल झाल्यापासून हगवणे कुटुंब फरार आहे. सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून वैष्णवी यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप वैष्णवीच्या घरच्यांनी केलाय. याचदरम्यान वैष्णवीची मोठी जाऊ अर्थात हगवणे कुटुंबातील मोठी सून मयुरी ह्यांनी हगवणे कुटुंबावर थेट आरोप केलेत.

वैष्णवी हगवणे यांची मोठी जाऊ अर्थात शशांक हगवणेचा मोठा भाऊ सुशील हगवणेची पत्नी मयुरी ह्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना हगवणे कुटुंबियांवर गंभीर आरोप केलेत. वैष्णवीचा नवरा शशांक हगवणे, त्याचे आई-वडील आणि नणंद या सगळ्यांनी पती सुशील व आपल्याला मारहाण करत असायचे असा आरोप मयुरी यांनी केलाय. या मारहाणीमुळे झालेल्या जखमांचे फोटोही मयुरीने यांनी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींना दाखवलेत.

मला आणि पतीला मारलं

सासरे राजेंद्र हगवणे यांनीही आपल्यावर हात उचलल्याचा आरोप मयुरी हगवणेनं केलाय. मयुरी आणि सुशील यांचा विवाह २०२२ साली झाला होता. पण नणंद, दीर, सासू यांनी माझा कायम छळ केला. सासूनं माझे कधी लाड केले नाहीत. जर त्यांनी लाड केले तर नणंद त्यांना त्रास देत असायची. पण पती सुशील मला साथ देत होते, ते माझ्या पाठीशी होते. ते पाहून त्यांनी माझ्या पतीला देखील मारलं. इतकेच नाही तर त्यांनी माझ्या मुलालाही मारलं, असा आरोप मयुरी यांनी केलाय. नणंद आणि दीराने आपल्या चारित्र्यावर संशय घेतला असंही मयुरी यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed: सप्तश्रृंगी देवीच्या मिरवणुकीत अघोरी प्रकार, अजित पवार गटाच्या नेत्यानं रस्त्यावर कोंबडा कापला अन् हळद कुंकू वाहून..

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

SCROLL FOR NEXT