साेलापूर : वाळूचा (sand) ट्रक थांबवून दाेन लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी प्रहारच्या महिला जिल्हाध्यक्षा संजीवनी बारंगुळे (sanjivani baruanglae) यांच्यासह पाच जणांविरुद्ध वैराग पोलीस ठाण्यात (vairag police station) गुन्हा दाखल झाला आहे. (solapur crime news)
मंगळवेढ्यावरुन (mangalvedha) वाळू भरुन निघालेला ट्रक वैरागमार्गे बीड (beed) येथे जात असताना मानेगाव येथे ट्रक अडवून दोन लाख रुपये मागितल्याची तक्रार दाखल करण्यात आली हाेती. यापैकी दहा हजार दिले परंतु राहिलेली पैसे न दिल्याने ॲट्रॉसिटी आणि बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी सूरज श्रीपती शेळके यांना दिल्याची तक्रार त्यांनी बारंगुळे यांच्याबाबत केली.
या तक्रारीची नाेंद घेत (solapur) प्रहारच्या जिल्हाध्यक्ष संजीवनी बारंगुळे यांच्यासह पाच जणांवर वैराग पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.