kirtankar sangita pawar case update Saam t
महाराष्ट्र

Sangita Pawar case : मोहटा देवी मंदिरात दोघांची एन्ट्री; महिला कीर्तनकाराला अचानक जाग; पुढं भयंकर घडलं..., महाराष्ट्राला हादरवणारं हत्याकांड

kirtankar sangita pawar case update : महाराष्ट्राला हादरवणारं हत्याकांड छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलं. महिला कीर्तनकार संगीता पवार यांची हत्या करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथील महिला कीर्तनकाराच्या हत्येच्या घटनेने महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. कीर्तनकार संगीता पवार यांच्या हत्येबाबत नवनवे खुलासा होत आहेत. संगीता पवार यांची हत्या चोरट्यांनीच केल्याचं उघड झालं आहे.

महिला कीर्तनकार संगीता पवार हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. संगीता पवार यांची दगडाने ठेचून हत्या झाली होती. हत्येदरम्यान महिरा कीर्तनकाराची हत्या झाल्याचे पोलिस तपासात उघड झालं आहे. या हत्या प्रकरणाचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे. या हत्या प्रकरणात पोलिसांनी दोघांना मध्य प्रदेश सीमेवरून अटक केली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरच्या महिला कीर्तनकार संगीता पवार यांच्या हत्येचा उलगडा ग्रामीण पोलिसांनी केला आहे. संतोष उर्फ भायला जगन चौहान आणि अनिल उर्फ हावडा नारायण विलाला असे दोन आरोपीला पोलिसांनी मध्यप्रदेश सीमेवर अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी चोरी करण्यासाठी मोहटा देवी मंदिरात आले होते. त्यावेळी संगीता पवार या जागे झाल्याने त्यांचा खून केला असल्याचं समोर आलंय.

दोन्ही आरोपी मध्य प्रदेशातील राहणारे आहेत. ते वैजापूर तालुक्यातील गाढे पिंपळगाव परिसरामध्ये मजुरी काम करीत होते. सद्गुरु नारायणगिरी आश्रम येथील मोहटादेवी माता मंदिरामध्ये दानपेटी, छोट्या मुर्त्या आणि इतर साहित्य असल्याचे त्यांना माहीत होते. त्यात सोने असू शकते, असा अंदाज असल्यानं चोरीच्या उद्देशाने ते कुलूप तोडत होते. त्याचवेळी बाजूच्या पत्र्याच्या शेडमध्ये सुनीता पवार या झोपलेल्या होत्या. त्या जागी झाल्याचे लक्षात आल्यानंतर मोठा दगड त्यांच्या डोक्यावर टाकून त्यांचा खून या दोघांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rush Driving: रस्त्यावर वाहन चालवताना 'या' चुका केल्या तर नाही मिळणार विमा: सुप्रीम कोर्ट

Shocking: वॉशरूमध्ये लपून महिला सहकाऱ्यांचे VIDEO काढायचा, इन्फोसिसच्या इंजिनीअरला अटक

Nails Cutting Tips: नखं कापण्यासाठी योग्य दिवस कोणता?

कन्नड नगरपरिषदेची जुनी इमारत पत्त्यासारखी कोसळली, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी दुर्घटना; थरारक VIDEO

Nashik News: देव्हाऱ्याखाली दारूचा साठा सापडला, दृश्य बघून पोलिसही चक्रावले | VIDEO

SCROLL FOR NEXT