Shreya Maskar
बटाटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार सोलून किंवा न सोलता खाऊ शकता. मात्र जास्त फायदेशीर काय, जाणून घेऊयात.
बटाट्याच्या सालीमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.
बटाट्याच्या सालीमध्ये असलेले फायबर पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.
बटाट्याच्या सालीमधील पोटॅशियम आण कॅल्शियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात.
बटाट्याच्या सालीचा रस त्वचेचा काळवंडपणा दूर करण्यासाठी रामबाण उपाय आहे.
बटाट्याची सालीत जास्त पोषक घटक असतात, त्यामुळे बटाटी सालीसकट खाणे जास्त फायदेशीर ठरते.
बटाटा सालीसकट खाणार असाल तर व्यवस्थित धुवून घ्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.