Police action intensifies as notice served to Vaibhav Naik ahead of farmers’ rasta roko protest in Sindhudurg. Saam Tv
महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराला पोलिसांची नोटिस; राजकीय वर्तुळात खळबळ

Police Notice To Vaibhav Naik Before Farmers Protest: सिंधुदुर्गमध्ये आंबा आणि काजू बागायतदारांच्या नुकसान भरपाईसाठी होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनाआधी ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांना पोलिसांनी नोटीस बजावली.

Omkar Sonawane

विनायक वंजारे, साम टीव्ही

आंबा काजू नुकसानी बद्दल नुकसान भरपाईच्या मागणीसाठी 23 मार्च रोजी नांदगाव येथे रास्ता रोको आंदोलनाचा इशारा आंबा बागायतदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिल्यानंतर या आंदोलनाशी संबंधित असलेल्या नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा बजावण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांना देखील नोटीस पोलिसांनी बजावली आहे. सरकार पोलीस बळाचा वापर करून आंदोलन दडपू पाहत असल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 3 एप्रिल पर्यंत मनाई आदेश लागू असून या कालावधीत आंदोलनादरम्यान कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य कृती किंवा चिथावणीखोर वक्तव्य केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची जबाबदारी आपली राहील असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. प्रशासनाकडून आंदोलनकर्त्याना या नोटिसा बजावणी सुरू करण्यात आल्याने आंबा, काजू बागायतदरामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

नोटीसा आल्यातरी उद्याचा रास्ता रोको होणारच- वैभव नाईक

दरम्यान शेतकऱ्यांना काढलेल्या नोटिसा म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे असा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. सोमवारी होणारा रास्ता रोको कोणालाही त्रास न होता शांततेत निघेल. आमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हा रास्ता रोको आहे. नोटिसा काढून हा मोर्चा कोणीही थांबू शकणार नाही. दडपशाहीचा प्रकार केल्यास त्यांचा उद्रेक होईल. नोटिशीला न घाबरता मोर्चात शेतकरी मोठ्यासंख्येने सहभागी होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG New Rules : ...तर तुमचं LPG कनेक्शन होईल बंद; सरकारचे नवे नियम लागू, हे महत्वाचं काम झटपट कराच

Maharashtra News Live Update: जालन्यातील बदनापूर शहरात धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात शिवप्रेमी आक्रमक

बीडच्या परळीत आता सोमवारी मांस विक्रीवर बंदी, पालिकेनं का घेतला निर्णय?

Sugarcane Juice Side Effects: उन्हाळ्यात उसाचा रस कोणी पिऊ नये?

HSC Result 2026 : बारावीचा निकाल इतका का घसरला? बोर्डाने सांगितलं नेमकं कारण, वाचा

SCROLL FOR NEXT