Vaibhav Khedkar joins BJP in the presence of Ravindra Chavan; three earlier muhurats for his entry had been delayed. saam tv
महाराष्ट्र

Konkan Politics: अखेर वैभव खेडेकरांचा भाजपमध्ये प्रवेश, तीनवेळा हुकला होता मुर्हूत

Vaibhav Khedkar : वैभव खेडेकर यांनी अखेर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. खेडेकर यांच्या भाजप प्रवेशामुळे कोकणातील राजकारण पूर्णपणे बदलून गेलंय.

Bharat Jadhav

  • तीन वेळा मुहूर्त हुकल्यानंतर अखेर वैभव खेडेकरांचा भाजपमध्ये प्रवेश झाला.

  • भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश सोहळा पार पडला.

  • महायुतीच्या संपर्कात असल्याने मनसेने त्यांच्यावर कारवाई केली होती.

तीन वेळा मुर्हूत हुकल्यानंतर आज अखेर वेभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश झाला. भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश झाला. काही दिवसांपासून खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश रखडला होता.

महायुतीच्या संपर्कात असल्याने तसेच भाजपचे नेते मंत्री नितेश राणेसोबत बैठका घेतल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तळकोकणातील नेते वैभव खेडेकर यांच्यावर कारवाई केली होती. त्यानंतर खेडकर हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. खेडकर यांच्या भाजप प्रवेशावेळी कराडमधील चार नगरसेवकांनी मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये यशवंत आघाडीच्या स्मिता हुलवान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून विधानसभा निवडणुक लढलेले इंद्रजीत गुजर यांचा समावेश आहे.

दरम्यान मनसेनं हकालपट्टीची कारवाई केल्यानंतर त्यांनी आपली निर्णय जाहीर केला होता. मात्र तीनवेळा त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकलेला नसल्यानं त्यांच्यावर टीका केली जात होती. त्यानंतर शिवसेनेने त्यांना ऑफर दिली होती. भाजपनं जसे तीनदा केलं ते आम्ही करणार नाही असा टोला ही शिवसेनेने भाजपला मारला होता.

वैभव खेडेकर हे राज ठाकरेंचे निष्ठावंत नेते म्हणून ओळख. मनसेच्या स्थापनेपासून ते पक्षात कार्यरत होते. वैभव खेडकर यांनी २०१४ साली दापोली विधानसभा निवडणूक लढवली मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. दरम्यान खेड नगरपरिषदेत मनसेची सत्ता आणण्यात खेडेकर यांचा महत्त्वाचा वाटा होता. यापूर्वी ते खेडचे नगराध्यक्ष राहिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bus Fire : नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती! प्रवाशांनी भरलेल्या AC बसला आग लागली; 12 जणांचा मृत्यू

Antibiotics Side Effects: अँटिबायोटिक्स घेताहेत भारतीयांचा जीव? WHO च्या इशाऱ्याने भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Fight Video: डेक्कन चौकात दहशत! नदीपात्रातील चौपाटीवरील हॉटेलमध्ये मारामारी

Fact Check: तुमच्या कॉफीमध्ये झुरळाची पावडर, व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

BMC Election : मोठी बातमी! राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका कधी होणार? महत्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT