VAIBHAV CHAVAN DEATH CASE saam tv
महाराष्ट्र

बोगस क्रीडा प्रमाणपत्र घोटाळ्यात नवा ट्विस्ट; वैभवच्या कुटुंबीयांचा घातपाताचा संशय

Vaibhav Chavan Death Case Takes a New Twist: राज्याच्या क्रीडा क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याला नवं वळण लागलंय. घोटाळा उघड करणाऱ्या वैभव चव्हाणचा बीडमध्ये मृतदेह आढळून आलाय. मात्र, वैभवची हत्या की आत्महत्या यावरून चर्चांना उधाण आलंय. पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...

Rohit Kadam

बोगस क्रीडा प्रमाणपत्र सादर करून शासकीय नोकरी मिळवणाऱ्यांचे रॅकेट उघडकीस आल्यानं राज्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र, हा घोटाळा उघडकीस आणणाऱ्या वैभव चव्हाणचा बीडमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळलाय. महत्त्वाचं म्हणजे, माझ्या आणि माझ्या मित्राच्या जीवितास धोका असल्याच्या वैभवच्या ऑडिओ रेकॉर्डिंग्स व्हायरल झाल्या आहेत. वैभव चव्हाणच्या मृत्यूपुर्वीची कथित ऑडिओ क्लिप साम टिव्हीच्या हाती लागलीये...

तर दुसरीकडे, वैभवच्या मृत्यूप्रकरणी त्याच्या कुटुंबियांनी घातपाताचा आरोप करत सखोल चौकशीची मागणी केलीये... बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून वैभवच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिलीये... दरम्यान, राज्याच्या क्रीडा क्षेत्रात खळबळ उडवून देणारा बोगस क्रीडा प्रमाणपत्र घोटाळा कसा उघडकीस आला होता ते पाहूयात...

वैभवच्या मृत्यूनं बोगस क्रीडा प्रमाणपत्र घोटाळ्याची राज्यभरात पुन्हा एकदा चर्चा रंगलीये. वैभवच्या मृत्यूमागे कुराश संघटनेचा हात असल्याचा आरोप करत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी चव्हाण कुटुंबियांनी केलीय. त्यामुळे हा घोटाळा बाहेर काढणाऱ्या वैभवची हत्या आहे की आत्महत्या याची सखोल चौकशी करण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पनवेलमध्ये भाजपच्या दिग्गज नेत्यांची बैठक; प्रदेशाध्यक्षांनी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र, ठरवली पुढील रणनीती

साखरेचे दर पुन्हा कडाडणार! साखर उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज; साखरेचे नेमके दर किती वाढणार?

Sheeps Won Thar: ना मेंढरं विकली, ना व्यवसाय सोडला! मेंढरांसोबतच घरी आली रुबाबदार थार

AI in Medical Science: माणूस 1400 वर्षे जगणार? AI माणसाला दीर्घायुषी करणार? AI मुळे वृद्धत्वाची प्रक्रिया थांबणार?

Mandar Kiwale Case: पाच दिवसआधीच ठरला किवळेच्या हत्येचा प्लॅन; आरोपींचं पोलिसांनाच खुलं आव्हान

SCROLL FOR NEXT