Wardha Crime News Saam tv
महाराष्ट्र

Uttar Pradesh Crime News : हृदयद्रावक! भावानेच अवघ्या १० वर्षीय लहान भावाचा दिला बळी; कारण ऐकून तुमचंही काळीज हादरेल

Witchcraft : मांत्रिकाने मुलाच्या वयाच्या दुसऱ्या एका चांगल्या मुलाचा बळी देण्यास सांगितले.

साम टिव्ही ब्युरो

Witchcraft: उत्तर प्रदेश येथून काळीज पिळवटून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बहराइच येथे एका मांत्रिकाच्या सांगण्यावरून एका चुलत भावानेच आपल्या लहान भावाची हत्या केली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी आरोपी भावासह त्याच्या वडलांना देखील या प्रकरणी ताब्यात घेतलं आहे. (Uttar Pradesh)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नानपरा कोतवली येथील परसा या गावात २३ मार्च रोजी ही घटना घडली आहे. विवेक असं १० वर्षीय मृत मुलाचं नाव आहे. त्याचा मोठा चुलत भाऊ अनुप याने विवेकच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करत त्याची निर्घृण हत्या केली. तसेच शेतामध्ये त्याचं शव फेकून दिलं. बहराइच पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी यावर विवेकच्या वडलांशी सपर्क साधला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेकच्या वडिलांच्या तक्रारीवरून अनुप आणि त्याच्या वडलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनुपला देखील एक लहान मुलगा आहे. मात्र त्याची तब्येत सतत खराब असते. त्याला सारखी चक्कर येते.

त्यामुळे अनुप त्याला घेऊन दुसऱ्या गावातील एका मांत्रिकाकडे गेला होता. त्यावेळी त्या मांत्रिकाने मुलाच्या वयाच्या दुसऱ्या एका चांगल्या मुलाचा बळी देण्यास सांगितले. त्यामुळे अनुपने स्वत:च्याच भावाचा बळी दिला. पोलिसांनी या प्रकरणी मांत्रिक, अनुप आणि त्याच्या वडलांना देखील अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज ठाकरेंच्या भेटीला संजय राऊत, मनपा निवडणुकीवर होणार चर्चा

मुंबईसह ५ महापालिकेत ठाकरे बंधूंची युती, २ दिवसात घोषणा, उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराने सगळं सांगितलं, वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना e-KYC केली तरीही ₹१५०० कायमचे बंद होणार, नेमकं कारण काय? समोर आली अपडेट

Heart Attack: सायलेंट हार्ट अटॅक...अत्यंत धोकादायक आणि न समजून येणारी लक्षणं, काय आहेत जाणून घ्या

Marathi Movie Teaser: 'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?'; निर्मिती सावंत - प्रार्थना बेहेरे उलगडणार सासू-सुनेचं खट्याळ नातं, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT