Accident News Saam TV
महाराष्ट्र

Accident News: देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांवर काळाची झडप; कार-पिकअपच्या धडकेत ६ जण जागीच ठार

Uttar Pradesh Balia Accident News : धडकेत कार हवेत उडून रस्त्याच्या कडेला फेकली गेली. यासह पिकअपच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. या अपघातात पिकअपमधील काही व्यक्ती देखील गंभीर जखमी झाल्या आहेत.

Ruchika Jadhav

Uttar Pradesh News :

देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या कारला विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव पिकअपने जोरदार धडक दिली. या घटनेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर १० जण जखमी झाले. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना उत्तरप्रदेशातील बलिया परिसरातील सुघर-छपरा वळणावर मंगळवारी (२७ फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तींमध्ये दोन लहान मुलांचा देखील समावेश आहे. देवदर्शन करून घरी परतताना सर्वजण आनंदात होते. गाणी आणि ट्रिपच्या आठवणीत घरी चालले होते. मात्र रस्त्यातच काळाने त्यांच्यावर घाला घातला. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. आनंदाला विरझन लागलं. अपघात होताच रस्त्यावर आरडाओरडा आणि किंकाळ्या ऐकू आल्या.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेतले, तसेत जखमींना रुग्णालयात दाखल केलं. ज्यांची प्रकृती जास्त नाजूक आहे त्यांना वाराणसीमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या जखमींवर उपचार सुरू आहे. कुटुंबातील जवळच्या व्यक्तींना गमवल्याने साऱ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.

सदर अपघात इतका भीषण होता की, यामध्ये कार आणि पिकअपचा चक्काचूर झाला. पिकअप आणि कार देखील भरधाव वेगात होती. धडकेत कार हवेत उडून रस्त्याच्या कडेला फेकली गेली. यासह पिकअपच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. या अपघातात पिकअपमधील काही व्यक्ती देखील गंभीर जखमी झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Megablock : रविवारी मध्य अन् हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्याआधी वाचा वेळापत्रक

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam : ऑनलाइन भरणार मराठी शाळा; 'क्रांतिज्योती विद्यालय...' सिनेमा ओटीटीवर येणार, कुठे अन् कधी पाहाल?

How To Make Soft Idli: मऊ, लुसलुशीत इडली बनवण्यासाठी साहित्य काय वापरतात?

Maharashtra Live News Update: बारावीच्या दोन विषयांचे पेपर फुटले

Shimga 2026: गुड न्यूज! शिमग्यासाठी कोकणात बोटीने जा, मुंबई ते विजयदुर्ग फक्त ७ तासांत; वाचा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT