uttam jankar on valmik karad Saam TV
महाराष्ट्र

Uttam Jankar: वाल्मीक कराड यांनी ३२ खून केले; संतोष देशमुखप्रकरणी उत्तम जानकरांचा हल्लाबोल

Uttam Jankar on Valmik Karad: बीड जिल्ह्यामध्ये अफगाणिस्तानामधील कंधारपेक्षाही वाईट परिस्थिती आहे. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या राजकीय गुंडांकडून करण्यात आलीय. - वाल्मीक कराड

Bhagyashree Kamble

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथे माजी सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. हत्या प्रकरणातील आरोपी कोणाशीही संबंधित असतील त्यांच्यावर कारवाई होणारच असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन सादर करताना म्हटलं. दरम्यान माजी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या राजकीय गुंडाकडून करण्यात आलीय, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी केलाय. तसंच ज्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय, ते वाल्मीक कराडांनी ३२ खून केले असल्याचा खळबळजनक दावाही उत्तम जानकर यांनी केलाय.

बीड जिल्ह्यामध्ये अफगाणिस्तानामधील कंधारपेक्षाही वाईट परिस्थिती आहे. काही राजकीय नेत्यांनी गुंडांना हाताशी धरून मोठी दहशत पसरवलीय. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या देखील राजकीय गुंडांकडून करण्यात आलीय. वाल्मीक कराड या व्यक्तीनं ३२ खून केले आहे. वाल्मीक कराड हे धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत. या माणसाची प्रचंड दहशत आहे. असा गंभीर आरोप उत्तन जानकर यांनी केलाय.

वाल्मीक कराड यांच्या सांगण्यावरून बीड जिल्ह्यामध्ये सुमारे ३२०० लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलंय. अनेक आयएएस अधिकारी वाल्मिक कराड यांच्या घराबाहेर दरबार भरवतात. इतकी मोठी दहशत वाल्मीक कराडची आहे. याला राजकीय पाठबळ धनंजय मुंडे यांचं आहे. असाही घणाघातही त्यांनी केला. शरद पवार आज मस्साजोग येथे जाऊन संतोष देशमुख यांची भेट घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आमदार उत्तम जानकर यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

वाल्मीक कराड यांची दहशत अलिकडची नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागील ७ वर्ष सत्तेत आहेत. त्यांच्या काळापासून या लोकांची दहशत सुरूय. अशा लोकांविरोधात मैदानात उतरून आम्ही विरोध करू, निषेध करू, असा इशाराही उत्तम जानकर यांनी दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT