Gulf War Impact Saam tv
महाराष्ट्र

देशातील पेट्रोलचा साठा संपणार? युद्धाची झळ की अफवांचा वणवा? VIDEO

us-israel vs iran war : एकीकडे आखातात युद्धाचा वणवा पेटलेला असताना दुसरीकडे राज्यात पेट्रोलसाठी धावाधाव सुरु झालीय... पेट्रोलचा साठा खरचं संपणार आहे का? देशाकडे किती इंधन शिल्लक आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

पेट्रोलपंपावर लोटलेली ही गर्दी इराणवर झालेल्या हल्ल्याचा भारतावर होणारा थेट परिणाम दाखवणारी आहे... आखातातील युद्धामुळे पेट्रोल पंप बंद पडणार असल्याची अफवा राज्यात वाऱ्यासारखी पसरली... आणि याचं इंधन टंचाईच्या अफवांमुळे नांदेड, परभणी, संभाजीनगर, अमरावतीत पेट्रोलपंपावर खळबळ उडाली....अनेकांनी गाड्यांमध्ये पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या....

दुसरीकडे सकाळपासून इंधनासाठी रांगा लावूनही रिकाम्या हाती परतावं लागल्यानं वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केलीय. दरम्यान संभाव्य इंधन तुटवड्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क झालीय....जालन्यातील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांना शासकीय आणि अत्यावश्यक सेवेच्या वाहनांसाठी पेट्रोल-डिझेलचा साठा राखीव ठेवण्याचे आदेश दिलेत.

तसचं केंद्र सरकारकडून देखील पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी योग्य उपाययोजना सुरू असल्याचं सांगत. पेट्रोलच्या किंमती वाढणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलयं.

दरम्यान इराण-इस्रायल युद्धामुळे हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारा तेल पुरवठा थांबला असला तरी, रशियानं कच्च्या तेलाचा पुरवठा सुरू ठेवण्याचं आश्वासन दिलंय. केद्रानंही देशात कच्च्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं आधीच स्पष्ट केलयं... त्यामुळे सध्यातरी देशात इंधनाचा तुटवडा भासणार नाही, हेच सत्य आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Bhondu: महाराष्ट्राला भोंदूबाबाचा विळखा, भूत उतरवण्याच्या नावाखाली मुंबईकरांना गंडा; पाहा VIDEO

संत महाराजाचा आशीर्वाद घ्यायल्या गेलेल्या भाजप आमदाराला मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Sambhajinagar: 'संभाजीनगर महापालिकेत भुतांचा वावर', मंत्र्यांकडूनच अंधश्रद्धेला खतपाणी

Maharashtra Weather: महाराष्ट्र रेड झोनमध्ये! राज्यात उष्माघाताचे 3 बळी? ९ जिल्ह्यांना उष्णतेचा जास्त धोका

Fact Check : आधार कार्ड दाखवा, 3 लाख मिळवा? सरकारची नवी 'पीएम लोन स्कीम'? Video

SCROLL FOR NEXT