चित्रा वाघ यांच्या टीकेवरती, रुपाली चाकणकरांचे उत्तर (पहा व्हिडीओ) SaamTV
महाराष्ट्र

Chitra Wagh: 'उर्फी जावेद प्रकरणात महिला आयोगाची दुटप्पी भूमिका...' चित्रा वाघ यांचा आरोप, रुपाली चाकणकरांवर केली सडकून टीका

एकाच विषयात महिला आयोग दुटप्पी भूमिका घेत असून रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर बसण्याचा काहीही अधिकार नाही, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

Gangappa Pujari

Chitra Wagh: गेल्या काही दिवसांपासून भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदच्या कपड्यांवरुन जोरदार टीका केली होती. ज्यानंतर उर्फीनेही चित्रा वाघ यांना सडेतोड उत्तर दिले होते. या वादात महिला राज्य आयोगाने उडी घेत कोणी काय घालायचे हा ज्याचा प्रश्न आहे, असे म्हणले होते.

या वादानंतर चित्रा वाघ यांनी आज पुन्हा उर्फीचा नंगानाच चालू देणार नाही, असा इशारा दिला आहे. त्याचबरोबर चित्रा वाघ यांंनी राज्य महिला आयोग दुटप्पी भूमिका घेत असल्याचाही आरोप यावेळी केला आहे. (Chitra Wagh On Urfi Javed)

याबाबत अधिक माहिती अशी की, "चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी मुंबईच्या भर रस्त्यात सार्वजनिक ठिकाणी उर्फी नावाची एक महिला नंगा नाच करत आहे, एका महिलेकडून मला मेसेज आला त्याचवेळी मी शिवरायांच्या महाराष्ट्रात मी हा नंगा नाच चालू देणार नाही, माझा विरोध उर्फीला नाही, तिच्या अंगप्रदर्शनाला आहे," असा खुलासा चित्रा वाघ यांंनी केला.

त्याचबरोबर या प्रकरणात महिला आयोगावरही त्यांनी सडकून टीका करताना, "एकाच विषयात महिला आयोग दुटप्पी भूमिका घेत असून रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर बसण्याचा काहीही अधिकार नाही," असेही त्या यावेळी म्हणाल्या.

"महिला आयोगाला उर्फीच्या प्रकरणात लक्ष घालायला वेळ नाही, मात्र अनुराधा वेबसिरीजच्या पोस्टरवरुन त्यांनी अभिनेत्री तेजस्विनी पंडितला नोटीस पाटवली होती, त्यामुळे एकाच प्रकरणात महिला आयोग दुटप्पी भूमिका घेत आहे. उर्फीला गोंजारायचे काम सुरू आहे," असा आरोप त्यांनी यावेळी केला.

यावेळी चित्रा वाघ यांनी हा नंगानाच विरोधकांना चालतो का असा सवालही उपस्थित केला. त्याचबरोबर चार भिंतीच्या आत जे करायचे ते करा, पण हा नंगानाच उघड्यावर चालू देणार नाही, असा ईशारा त्यांनी यावेळी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunil Shelke: महाराष्ट्रातील आमदारांच्या हत्त्येचा कट?आमदाराला संपवण्याचा डाव कुणाचा?

Wardha News : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली; मुलासह वडिलांचा करुण अंत, पुतण्याची मृत्यूशी झुंज

Modi Government: मोदी देणार विद्यार्थ्यांना 1 कोटी? आयडिया देणारा होणार मालामाल?

Mumbai Police : एसीबीची मोठी कारवाई; मुंबई पोलीस दलातील २ बड्या अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Chhagan Bhujbal: आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार, ओबीसींसाठी भुजबळांचा एल्गार

SCROLL FOR NEXT