Nagpur News Saam TV
महाराष्ट्र

Nagpur News: स्वप्न पूर्ण न झाल्याने तरुणाने मृत्यूला कवटाळलं; UPSCची तयारी करणाऱ्या तरुणाची अत्महत्या

UPSC Student End Life : सिद्धार्थ कांबळे असं 25 वर्षीय तरुणाचं नाव असून तो मूळचा गंगाखेड परभणी येथील रहिवासी होता. आएएस आएपीएस (IPS) होता न आल्यामुळे आत्महत्या करत असल्याचं त्याने मरणापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केलंय.

Ruchika Jadhav

UPSC Student News:

राज्यात सध्या बेरोजगार तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. अनेक तरुण अधिकारी व्हायचं स्वप्न उराशी बाळगून यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास सुरू करतात. बराच अभ्यास करूनही अनेकांना अपयश येतं. असचं स्वप्न नागपुरच्या एका तरुणानेही पाहिलं. मात्र त्याचं हे स्वप्न भंगलं. अपयश आल्याने या तरुणाने थेट या जगाचा निरोप घेतला आहे. विषारी द्रव्य पिऊन त्याने आत्महत्या केलीये. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नागपुरातील (Nagpur) राजहंस हॉटेलमध्ये ही हृदयद्रावक घटना घडलीये. सिद्धार्थ कांबळे असं 25 वर्षीय तरुणाचं नाव असून तो मूळचा गंगाखेड परभणी येथील रहिवासी होता. आएएस आएपीएस (IPS) होता न आल्यामुळे आत्महत्या करत असल्याचं त्याने मरणापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केलंय. त्याच्या मृत्यूला कोणीही जबाबदार नसल्याचही चिठ्ठीत उल्लेख आहे.

सिद्धार्थ २५ नोव्हेंबर पासून बेपत्ता होता. गंगाखेड पोलीस स्टेशनमध्ये तो बेपत्ता असल्याची त्याच्या कुटुंबीयांनी दाखल केली होती. त्याच्या सीडीआरवरून तो नागपुरातील राजहंस हॉटेलमध्ये असल्याची माहिती गंगाखेड पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ तेथे धाव घेतली.

गंगाखेड पोलिसांनी राजहंस हॉटेलमध्ये विचारपूस केली तेव्हा रूमचा दरवाजा उघडत नव्हता. पुढे स्थानिक पोलिसांच्या मदतीने रूमचा दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी तरुण मृत अवस्थेत आढळून आला. प्राथमिक अंदाजानुसार त्यांने रासायनिक पदार्थांचे सेवन केल्यामुळे आत्महत्या केली आहे.

सिद्धार्थ नोकरी करत नव्हता. तो अविवाहित होता. यासह तो मानोरुग्ण असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. कारण पोलिसांना त्याचे गेल्या एक वर्षापासून मानसरोग तज्ञाचे उपचार सुरू असल्यालेल्या कागदपत्रांची फाईल मिळालीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT