UPSC Result : महाराष्ट्रातील 100 हून अधिक उमेदवार यशस्वी! SaamTvNews
महाराष्ट्र

UPSC Result : महाराष्ट्रातील 100 हून अधिक उमेदवार यशस्वी!

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशातील एकूण 761 उमेदवारांपैकी 100 हून अधिक महाराष्ट्रातील उमदेवारांनी यश संपादन केले आहे. राज्यातून मृणाली जोशी प्रथम तर विनायक नरवाडे दुसऱ्या क्रमांकावर आहे.

विहंग ठाकूर

नवी दिल्‍ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशातील एकूण 761 उमेदवारांपैकी 100 हून अधिक महाराष्ट्रातील उमदेवारांनी यश संपादन केले आहे. राज्यातून मृणाली जोशी प्रथम तर विनायक नरवाडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशभरातील गुणानूक्रमानुसार हे दोघे 36 आणि 37 व्या स्थानावर आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाचा वर्ष 2020 च्या परिक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला. या निकालात पहिल्या 100 उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील 5 उमेदवारांचा समावेश आहे.

गुणानुक्रमानुसार महाराष्ट्रातील पहिले १० उत्तीर्ण विद्यार्थी :

यामध्ये मृणाली जोशी (36), विनायक कारभारी नरवाडे यांचा (37) क्रमांक आहे. रजत रविंद्र उभयकर यांचा (49) आहे. यासह जयंत नाहाटा (56), धीनह दस्तरगीर विनायक महामुनी (95) लक्ष्य कुमार चौधरी (132) शुभम कुमार खंडेलवाल (133), रीचा कुलकर्णी (134), कमलकीशोर देशभुष खंडारकर (137), अवध सोमनाथ निवृत्त (166)

एक नजर निकालावर :

केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी 2020 मध्ये परीक्षा घेण्यात आली. कोरोनाच्या प्रार्दूभावामुळे मुलाखती घेण्यास यावर्षी उशीरा झाला. लेखी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यावर्षीच्या फेब्रुवारी ते जुलै या महिन्यात मुलाखत घेण्यात आली. या परिक्षेच्या निकालातील उत्तीर्ण 761 उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यामध्ये सामान्य (ओपन) गटातून - 263, आर्थिक मागास प्रवर्गातून (ईडब्ल्यूएस) 86, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून (ओबीसी) – 229, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) – 122, अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 61 उमेदवारांचा समावेश आहे.

एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये 25 शारीरीकरित्या दिव्यांग उमेदवारांचा समावेश आहे. लोकसेवा आयोगाने 150 उमेदवारांची आरक्षित सूची (Reserve List) तयार केली आहे. यामध्ये सामान्य गट- 75, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) -14, इतर मागास वर्ग - 55, अनुसूचित जाती - 05, अनुसूचित जमाती - 01 उमेदवारांचा समावेश आहे.

'या' रिक्त जागांवर उमेदवार होतील रूजू :

भारतीय प्रशासन सेवा (आय.ए.एस.) या सेवेत शासनाकडे एकूण -180 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (जनरल) – 72, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 18 इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) – 49, अनुसूचित जाती (एस.सी.) – २8, अनुसूचित जमाती (एस.टी.) – 13 जागा रिक्त आहेत. गुणाणूक्रमे रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

भारतीय विदेश सेवा (आय.एफ.एस.) या सेवेत शासनाकडे एकूण – 36 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (ओपन) – 15, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 03, इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) – 10, अनुसूचित जाती (एस.सी.) – 05, अनुसूचित जमाती (एस.टी.) – 03 जागा रिक्त आहेत.

भारतीय पोलिस सेवा (आय.पी.एस.) या सेवेमध्ये एकूण – 200 जागा रिक्त आहेत, यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 80, उमेदवार आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 20, इतर मागास प्रवर्गातून - 55, अनुसूचित जाती प्रवर्गातून - 30, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 15 उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे.

केंद्रीय सेवा गट अ - या सेवेमध्ये एकूण - 302 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) - 118 उमेदवार, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 34, इतर मागास प्रवर्गातून - 84, अनुसूचित जाती प्रवर्गातून - 43 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 23 उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.

केंद्रीय सेवा गट ब - या सेवेमध्ये एकूण – 118 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) - 53, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 11 उमेदवार, इतर मागास प्रवर्गातून - 31, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 16 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 07 उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.

151 उमेदवारांची निवड तात्पुरती आहे.

अधिकृत निकाल व यशस्वी उमदेवारांची नांवे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत.


Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WTC Final Scenario: दक्षिण आफ्रिकेचा टीम इंडियाला दे धक्का... WTC च्या शर्यतीतून बाहेर पडणार?

Raver Assembly constituency : रावेर विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत; कोण विजयी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष

Maharashtra News Live Updates : धार्मिक विधींसाठी साईसमाधी मंदिरात भाविकांना दोन तास दर्शन राहणार बंद

MNS News : अकोल्यात कार्यकर्त्यांकडूनच मनसे कार्यालयात राडा! पाहा काय आहे प्रकरण | VIDEO

Bigg Boss 18: 'टाइम गॉड' बनताच विवियनचा स्वॅगच बदलला, थेट 'या' दोन सदस्यांना पाठवलं जेलमध्ये

SCROLL FOR NEXT